मालेगांवात घरफोड़ी ; सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास

ठाणेदाराच्या घरा मागेच चोरी . पोलीस गस्तीचा ढिसाळपणा कारणीभुत असल्याचा नागरीकांचा आरोप
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम /मालेगांव -: मालेगाव येथील नागरतास रोडवर असलेल्या गीता नगरमधे डॉ अनुप सांबपुरे यांचे कुटुंब बाहेरगांवी गेल्याची संधी साधुन चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना २७ एप्रिलच्या रात्री दरम्यान घडली . सोन्या चांदीचे दागीने व रोख रकमेसह सुमारे दोन लाख रुपयाचा ऐवज चोरटयांनी
चोरून नेला . सदर घटनास्थळ हे मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या घराच्या मागच्या बाजूलाच हाकेच्या अंतरावर आहे . हे विशेष .
डॉ सांबपुरे हे आई – वडील व पत्नी आणी मुलाबाळासह २७ एप्रील रोजी सकाळी कामानिमित्त बाहेरगांवी गेले होते . ही संधी साधुन त्याच रात्री त्यांच्या घराचे समोरच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला . त्यानंतर त्यांनी बेडरुम मधील लोखंडी कपाट उघडुन त्यामधील कपडे व इतर वस्तु अस्ताव्यस्त केल्या . त्यामधे असलेले चांदीची समई वजन १५० ग्रॅम , चांदीचा ग्लास वजन अंदाजे ५० ग्रॅम असे एकुण २o० ग्रॅम दागीणे लंपास केले . त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरूम कडे वळवला . तेथे असलेल्या कपाटा मधील 53 हजार रुपये रोख आणि 26 ग्रॅम सोन्याचे दागिने हे चोरून नेले . या सोन्याच्या दागिन्याची अंदाजे किंमत दीड लाख रुपये आहे . असा एकूण सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला . 28 एप्रिल रोजी जेव्हा डॉक्टर सांबपुरे यांचे कुटुंब घरी आले तेव्हा त्यांना घरामध्ये घरफोडी झाल्याचा अंदाज आला . घरामध्ये जाऊन बघितले असता घरातील अलमाऱ्या तोडलेल्या होत्या .त्यामधील सामान व साहित्य अस्ताव्यस्त दिसले .त्यामुळे त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फोनवरून तशी माहिती दिली . माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला . आणि वाशिम वरून डॉग स्कॉड तसेच फॉरेन्सिक लॅबला तशी सूचना करून त्यांना घटनास्थळी बोलावुन घेतले . डॉग घटनास्थळावरील साहित्य चा वास घेऊन घराबाहेर आला आणि नागरतास रोड पर्यंत चोरांचा माग दाखवला . त्यानंतर मात्र डॉग परत आला . त्यामुळे चोरांचा पत्ता व माहिती पोलिसांना मिळू शकली नाही . ठसे तज्ञांनी घरातील अलमारी व इतर साहित्याचे ठसे घेऊन तसा अहवाल पोलीस स्टेशनला दिला . सदर फॉरेन्सिक टीम मध्ये एपीआय रिंडे मॅडम पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोटे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश इंगोले तसेच डॉगर स्कॉड मध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल शेजुलकर हे होते . तसेच मालेगाव चे ठाणेदार तसेच पीएसआय गजानन चौधरी पीएसआय राहुल गंधे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलीस कॉन्स्टेबल आशिष बिडवे व त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380,457 भादविनुसार गुन्हा दाखल केला .
विशेष म्हणजे सदर घटनास्थळ हे ठाणेदार यांच्या घरामागेच असुन झालेली चोरी ही पोलीसांच्या रात्रीच्या गस्ती मधे असलेला ढिसाळपणा व पोलीसांचा धाक चोरटयांना राहीला नसल्याचे ध्योतक असल्याचे बोलल्या जात आहे .



