महाराष्ट्रविदर्भ

रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकररेल्वेतून पडल्याने एका बावीस वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना येथील रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बिस्वाब्रीज येथे २५ एप्रिल रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.या प्रकरणी बिस्वाब्रीजचे स्टेशन मास्टर यांच्या तक्रारीवरून शेगाव रेल्वे पोलिसांनी आकस्मिकमृत्यूची नोंद केली आहे. मृत अज्ञात महिलेचा रंग गोरा असून उंची पाच फूट दोन इंच असून चेहरा गोल आहे. महिलेचे केस काळे असून तिने पांढरे टी शर्ट व निळ्या रंगाचा जिन्स पॅण्ट परिधान केला आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास सहायक पोलिस निरीक्षक मगर व तपास अंमलदार पोहेकॉ डिगांबर राठोड यांच्याशी संपर्क साधावा.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button