महाराष्ट्रविदर्भ

शासकीय कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन ठिकाणचा ठराविक वेळ तरी कोणता?*

* (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) शेगाव तालुक्यात येत असणाऱ्या शाळा, ग्रामपंचायत,तसेच शासकीय तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,व शिक्षण विभाग,कृषी विभाग, मनपा,यातील अधिकारी बहुतेकदा आम्ही फिल्डवर आहोत असे सांगून बाहेर जातात. त्याची शहानिशा केली तर आम्ही ऑन ड्युटी आहोत.आज आम्ही फिल्ड वर्क वर आहोत.असे काही ना काही कारण सांगून हप्त्याची चार दिवस सुट्टीवर असतात. व सामान्य जनतेची दिशाभूल करतात. शासकीय कामाची दखल न घेता मोठे दस्तऐवज किंवा इतर शासकीय काम असून सुद्धा सामान्य नागरिकांना याच्या पाठीमागे धावपळ करावी लागते. अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांना त्रास जाणवायला लागला यात काही शंका नाही. कुठल्याही शासकीय कार्यालयांमध्ये ही गर्दीची जणूकाही लाटत उसळती असते.कारण.कायमची कामाची सुट्टी घेऊ ऑन ड्युटी बोर्ड लावून ते फिरत असतात.सुट्टीवर असताना त्यांचा पदभार स्विकरणारे अधिकारीही काम चुकार पणा करतात. साहेब,किंवा मॅडम हजर नाही असे सांगून त्या कामाची दखल न घेता तारीख वर तारीख तसेच अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे तुमचे काम होऊ शकत नाही, असे सांगून उडवा उडवीचे उत्तरे देतात. तसेच वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर असताना सुद्धा त्यांची सुट्टीची नोंद किंवा अर्ज शासकिय सुट्टीच्या यादीत नसते.याचे मोठे आश्चर्य मानावे लागेल.काही ना काही कामानिमित्ताने आपल्या कामाचे कागदपत्रे सर्व असून सुद्धा कामाचे आश्वासन देऊन काम अपुरे पाडण्यास भाग पाडतात. सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे जबाबदार तरी कोण? निवडून दिलेले लोकप्रतिनिधी? की लोकप्रतिनिधीच्या इशाऱ्यावर काम करणारे अधिकारी?या मोठ्या अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या जाळ्यात सामान्य माणूस गुंतून ठेवला आहे. आपल्या कामाची उदासीनता अधिकाऱ्याकडून होत असल्याने मोठा प्रश्न जनतेसमोर निर्माण झालेला आहे. कायद्याची भीती कुणाला राहिली नाही. असे म्हटले तरी काही वागव ठरणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाने जीवनाची ज्योत जळते व तिथून आपली जीवन घडते. असे आपण मानतो परंतु, खेडे विभागातील ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक बहुदा वर्षाच्या काहीच दिवस ते वेळेवर हजर असतात. तालुक्यातील काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वतः प्रार्थना घेऊन वर्गामध्ये प्रवेश करतात.आणि वर्गाची खोलीची चावी आहे ती तिथल्या अशा जवळ दिलेली असते. अकराला शाळेत येणे व पाचला घरी जाणे हा नित्य नियमाचा शिक्षक लोकांचा नियम आहे. कायद्याच्या चौकटित राहून अधिकारी काम करतात हेच कायद्याचे मोठे रक्षक असतात.पण कायद्याचे रक्षक भक्षक झाल्याने सामान्य जनतेवर असंतोष निर्माण होऊन सरकारी अधिकाऱ्यांवर सामान्य जनतेचा रोष व्यक्त होत आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कामावर यायचा वेळ व जायचा वेळ निश्चित असावा ज्या दिवशी फिल्ड वर्क असणार त्यादिवशी अतिरिक्त अधिकाऱ्यांवर आपल्या कामाचा भाव सोपवून द्यावा.अश्या निकामी कामाने व मनमानी कारभाराने सामान्य माणसाची गडचिप्पी न व्हावी याकडे तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. व आपल्या पदावर कृतिशील राहून कार्य करावे.अशी सगळीकडून जनतेची मोठी मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button