महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्याशिवाई बस ड्रायव्हर व कंडक्टरचा मनमानी कारभार ,

बस मधून एका महिला पॅसेंजरला बळजबरी अर्ध्या रस्त्यात उतरून दिले
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- शंकर शिवरकर
देऊळगाव राजा (१६जुलै ) वार मंगळवार रोजी देऊळगाव राजा येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली,जालना येथून देऊळगावराजा ला एक पॅसेंजर महामंडळ एसटी बसमधून MH 20 GZ 0495 या बस मधून एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांना देऊळगाव राजा शहरात उतरायचं होतं पण महामंडळ बस कंडक्टर यांच्या अति मनमानी कृत्य वागणूकी मुळे महिला प्रवासी ला धक्काबुक्की देऊन अर्ध्या रस्त्यातच उतरून दिले .
एकीकडे शासन महिलांसाठी बसमध्ये वेगवेगळे योजना व सुविधा आश्वासन देते पण त्याच कर्मचाऱ्याकडून अशी वागणूक प्रवाशांना देण्यात येते . त्यामुळे
प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे, महामंडळावर सरकारचं वर्चस्व राहिले नाही का ? असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .
त्या अनुषंगाने प्रवासी महिलांनी त्यांना जाब विचारता त्यांनी उलट महिलेला धमकी दिली की .तुम्हाला जे करायचं ते करून घ्या आम्हाला कोणी काही करू शकत नाही असं कडक शब्दात त्यांनी महिलेला सुनावले.
प्रवाशांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करून बोलून घेतलं व सविस्तर घटनेची माहिती त्यांना दिली व नातेवाईकांनी देऊळगाव राजा बस डेपो येथे येऊन त्यांनी त्या कंडक्टरच्या व नागरे ड्रायव्हर यांच्या विरोधात कंप्लेंट देण्यासाठी आले .
श्याम शिंगणे यांच्या फिर्यादीवरून एसटी कंडक्टरनी समृद्धी रोडवर अर्ध्या रस्त्यात महिलेला उतरून दिले. बस ड्रायव्हर नागरे याने ने शिवीगाळ केली. काय करायचं करून घ्या . अशा शब्दात महिलेला सुनवलं व धक्काबुक्की केली. एक महिला असल्यामुळे नातेवाईकां मध्ये अतिरोष निर्माण झाला, बस ड्रायव्हर व नातेवाईक ची धक्काबुक्की झाली पण आगारातील लोकांनी सावरलं .प्रकरण लेखी स्वरूपात द्यावी अशी विनंती केल्यावर नातेवाईक थोडा नर्मवले
श्याम शिंगणे नातेवाईक यांनी बस डेपो मधील अधिकाऱ्याला सांगितले सर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही पद्धतीने जाब विचारू व कोर्टात जाऊ देऊळगाव राजा बस डेपो मधील कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिले की .आम्ही नक्की वरती महामंडळांना तुमची कंप्लेंट पाठवून देऊ नक्की कारवाई करू अशी आश्वासन दिले.
महामंडळ काय भूमिका घेतात याकडे लक्ष वेधून आहे.



