महाराष्ट्र

एसटी बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठारवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगांव :

13 एप्रिलनागपूर-मुंबई महामार्गावर धारपिंप्री गावाजवळ आज सायंकाळी 5.45 वाजता एसटी बसची धडक लागून धारपिंप्री येथील 32 वर्षीय मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची मिळालेली माहिती अशी की, धारपिंप्री येथील रहिवासी असलेला रोहिदास सुभाष डाखोरे वय 32 वर्ष हा 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5.45 वाजता त्यांच्या एम एच 37 झेड 8449 या मोटारसायकलने चांडस येथून धारपिंप्री या गावी येत होता. दरम्यान मागून येणारी सिल्लोड वाशिम एसटी बस क्रमांक एम एच 40 वाय. 5687 ची मोटारसायकलला धडक लागून रोहिदास डाखोरे यांचा जागीच मृत्यू झाला, एसटी बस चालकाने एसटी बस मालेगाव पोलीस ठाण्यात नेली व घटनेची माहिती दिली, घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुणवंत गायकवाड चालक नायब पोलीस कॉन्स्टेबल किशोर नवलकर शिरपुर पोलिस स्टेशन मधुन चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय घुले, पोलीस कॉन्स्टेबल गजानन डहाळके यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button