Uncategorized

गायगाव (बु .) ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करा_ग्रामपंचायत कार्यकारिणीची मागणी

***गायगाव ग्रामपंचायत सचिवाकडून मागासवर्गीय महिला सरपंचाला हिंनतेची वागणूक देण्याचा प्रकार*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगांव प्रतिनिधी श्याम पहुरकर५ एप्रिल              शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गायगाव ( बु.) ग्रामपंचायत चे सचिव आर.पी. गावंडे यांनी 23 फेब्रुवारी 2023 रोजी मासिक सभेमध्ये सरपंच व ग्रामपंचायत कार्यकारिणीने सांगितलेले ठराव घेण्यास नकार दिला.व शासन कर्मचारी असल्याचा गैरवापर केला. ग्रामसेवक गावंडे हा जातीयवादी मानसिकतेचा असून गायगाव ( बु.) येथील महिला सरपंच ही मागासवर्गीय असल्यामुळे सचिवाकडून महिला सरपंचाला अपमान तिची वागणूक मिळत आहे. ग्रामसेवक गावंडे हा सरपंचाच्या खुर्चीवर बसून सचिव व सरपंच एकटाच असल्याप्रमाणे दोन्ही अधिकार वापरत आहे. अशा प्रकारचे गायगाव ग्रामपंचायत कार्यकारिणीने बीडीओ देशमुख यांना तोंडी सांगितले असता शेगाव पंचायत समिती प्रशासन गावंडे ग्रामसेवकाची पाठराखण करत आहे. त्यामुळे ग्रामसेवक गावंडे हा सरपंच व ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेता मागासवर्गीय महिला सरपंच व सदस्य यांना अपमानित करून हिणतेची वागणूक देत आहे. व मासिक सभेमध्ये कामकाज विषयक ठराव मांडू देत नाही. गावकऱ्यांना सुद्धा अपमानित करतो. मनमानी पणाचे ठराव लिहून वरिष्ठांना सादर करतो. त्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसलेली आहे. सदर प्रकरणावर बुलढाणा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून गायगाव( बु.) चे ग्रामसेवक यांना निलंबित करा अशा प्रकारची तक्रार महिला सरपंच सौ. शारदा पवार. दीपक ढगे सदस्य. निलेश सोनोने सदस्य. सौ .रमाबाई सोनोने सदस्य .सौ. बिंदाबाई सहस्त्रबुद्धे सदस्य यांनी तक्रार निवेदनावर स्वाक्षऱ्या करून 1 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद सीईओ बुलढाणा यांच्याकडे दिलेली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button