महाराष्ट्रविदर्भ

माहिती अधिकारीच करतात कायद्याची पायमल्ली

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – सन 2005 साली संपूर्ण केंद्रात माहितीचा अधिकार कायदा लागू झाला त्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 चे संपूर्ण अधिकार देशातील आम नागरिकांना प्राप्त झाले व ते नागरिकांना समजूही लागले म्हणून त्यांच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या कार्यालयात माहितीच्या अधिकाराचा उपयोग करतात पण माहिती अधिकाऱ्यानेच कायद्याचे उल्लंघन केले तर काय?
असाच प्रकार नगरपंचायत मालेगाव येथे घडून आलेला आहे स्थानिक शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन काळे,कैलास बनसोडे, तसेच सुनील शर्मा,व शहरातील इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी नगरपंचायत मालेगाव शहरांमधील मंजूर कामाचे व यापूर्वी झालेल्या कामाचे माहिती मागण्यात आली होती सदर माहिती देण्यासाठी कायद्याने कलम 7’1′ नुसार बंधने घातलेली आहे जन माहिती अधिकारी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे त्या कार्यालयामध्ये अपरिहार्य कारणास्तव काहीही घडो तरी माहिती तीस दिवस पूर्व देण्याचे प्रावधान कायद्याने घातलेले आहे परंतु येथील मिलिंद कांबळे सहाय्यक करनिरीक्षक तथा जन माहिती अधिकारी यांनी अध्याप पावे तो माहिती न दिल्यामुळे मनमानीमुळे माहिती अधिकार कार्यकर्ते त्रस्त व तसेच बरेचसे माहिती आजपर्यंत दिलेल्या नाही आहे असे प्रकरण खूप आहेत जन माहिती अधिकारी यांच्या विरोधात प्रथम अपील अधिकारी तथा पंकज सोनोणे मुख्यअधिकारी नगरपंचायत मालेगाव यांच्याकडे अपील केले असून अपीलावर आतापर्यंत कार्यवाही नसल्या कारणामुळे प्रकरण प्रलंबित आहे जन माहिती अधिकारी यांच्या विरोधात अपील अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे लक्ष वेधून आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button