छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती तर्फे मुक्ताईनगर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन ..

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-सविस्तर वृत्त असे की छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजन महापुरुषांची जयंती मुक्ताईनगर मध्ये संयुक्त रित्या मनवली जाते यामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित करत असते त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे संयुक्त जयंती समितीद्वारे करण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन मन्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तर तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला डॉक्टर प्रवीण बोदडे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉक्टर निकिता बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मराठा सेवा संघाचे दिनेश कदम, नगरसेवक बापू ससाने, कृष्णा माळी, उमेश झाल्टे, अविनाश बोरसे, राजू बोदडे, रवींद्र बोदडे ,नंदू जाधव ,बहुजन मुक्ती पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी पवार, एडवोकेट कुणाल गवई, संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष अमोल बोदडे, पंकज झनके, भाजप तालुका उपाध्यक्ष हरीश बोदडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे ,गोविंदा शिरतुरे, प्रयास ग्रुप अन्नू बोदडे, शैलेश वानखेडे ,तसेच संयुक्त जयंती उत्सव समिती चे पदाधिकारी आणि बहुजन बांधव उपस्थित होते रक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील रेड प्लस सोसायटी चे डॉक्टर रवींद्र पाटील सर, दीपक पाटील, प्रमोद पाटील ,दानिश खान, तर आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर संग्राम वाघ ,डॉक्टर सुरज साबळे, डॉक्टर नीती मोटामेरी ,डॉक्टर ऐश्वर्या कुमटकर, परिचारिका खुशी ठाकरे ,ऋतिका बारेला, कामेश्वरी तायडे .आदींनी परिश्रम घेतले



