एटीएम कार्ड दुसऱ्याजवळ दिल्याचा चोरांनीपरस्पर २६ हजार उडविले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकरशेगाव | एटीएम मशीन पैसे काढतांना आपले मधून एटीएम कार्ड दुसऱ्याजवळ देणे एका इसमास चांगलेच महागात पडले. दोन भामट्यांनी हातचलाखीने सदर इसमाचे एटीएमकार्ड लंपास करून त्याद्वारे २६ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याची घटना खामगाव शहरात उघडकीस आली.खामगाव येथील टिचर कॉलनीतील रहिवासी मो. हारून ग्यासुद्दीन, वय ६४ वर्षे हे ३ एप्रिल रोजी पैसे काढण्यासाठीन नांदुरा रोडवरील हॉटेल देवेंद्रमधील इंडीयन ओव्हरसीज बँकेच्या एटीएममध्ये गेले. यावेळी तेथे दोनअज्ञात इसम उभे होते. पैसे काढतांना मो. हारूण यांना अडचण येत असल्याने त्यांनी या दोघांना विचारणा केली. त्यावेळी त्या भामट्यांनी मो. हारूण यांना त्यांच्जवळील बोगस एटीएम कार्ड देवून त्यांचे एटीएम कार्ड लंपास केले व तात्काळ दुसऱ्या ठिकाणावरून मो. हारूण यांच्या खात्यातून २६ हजार रूपये लंपास केले. आपल्या खात्यातून पैसे लंपास झाल्याचे लक्षात येताच मो. हारूण यांनी शहर पो.स्टे. गाठले आणि तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.



