महाराष्ट्र

पोलीस निरीक्षक श्री संजय चौधरी यांचे शिवभक्तांना आवाहन !;कायद्याचा भंग न करता शांततेत कावड विसर्जन करण्याचे आवाहन…

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – कावड विसर्जनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये आणि कावड विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडेल, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक श्री संजय चौधरी यांनी सर्व कावड शिवभक्तांना केले आहे कावड मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ठरवून दिलेल्या क्रमांकानुसारच कावड मंडळे सहभागी होतील,वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य असेल,कोणत्याही प्रकारचे बॅनरबाजी, राजकीय पक्षांचे किंवा महापुरुषांचे बॅनर हातात घेऊन नाचू नये,अशा सूचना श्री चौधरी यांनी शिवभक्तांना केलेल्या आहेत त्याचबरोबर डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे आणि ध्वनिप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे यावर्षीच्या कावड विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. कावड विसर्जन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व भक्तांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे डीजेच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.पोलीस निरीक्षक श्री चौधरी यांनी सांगितले की, “शिवभक्तांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे ही सुजाण व सुसंस्कृत नागरिक म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे कावड विसर्जनाच्या वेळी काही अनुचित घटना घडू नयेत याची खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असेही श्री चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या सूचनांमुळे सर्व सामान्य जनतेस कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व कावड मिरवणुक शांततेत पार पडेल अशी अपेक्षा आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button