राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा घनाघाती आरोप.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा.ता.प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मा राहुलजी गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. असून पुढे त्यांना घरही खाली करावे लागणार आहे तसेच उद्योगपत्यांचे अब्जावधी रुपयाची कर्जमाफी करण्यात आली त्याचा परिणाम महागाईचे रूपाने जनता सहन करत आहे या सर्व प्रकारावर राहुलजी गांधी यांनी संसदेत आवाज उठविला होता त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून घाबरुन केंद्र शासनाकडून त्यांनी संसदेत पुन्हा आवाज उठवू नये म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्याचे हे षडयंत्र सुरू आहे असा घणाघाती आरोप महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिव डॉ संजीवनी बिहाडे यांनी दि.3 एप्रिल सोमवार रोजी तेल्हारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मा.राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे तसेच त्यांना घर सुद्धा खाली करावे लागणार आहे ज्या परिवाराने त्यांचे अब्जो रुपये किमतीचे दोन प्रशस्त बंगले राष्ट्राला अर्पण केले आहे त्यांनाच बेघर करण्याचे काम केंद्रातील सत्तेत असणाऱ्या मोदी शासनाकडून सुरू आहे असा घनाघाती आरोप करत राहुलजी गांधी यांनी संसदेत उद्योगपती श्री आदानी यांचे कंपनीत गुंतवलेले वीस हजार कोटी रुपये हे अदानीचे नाहीत ते कुणाचे आहेत? असा साधा प्रश्न उपस्थित केला होता त्याचे उत्तर अजूनही प्राप्त झाले नाही ,त्यांना संसदेत बोलू दिल्या जात नाही याबाबत राहुलजी गांधी यांनी मा.लोकसभा अध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून मला बोलण्याची संधी द्यावी अशी विनंती सुद्धा केली परंतु त्याचा परिणाम झाला नाही याप्रमाणे लोकशाहीला धोका निर्माण होत आहे आज देशात केंद्र शासनाकडून अदानी ,अंबानी यांना विमा कंपनी , बँकात सर्वसामान्य नागरिकांचा असलेला कष्टाचा पैसा या उद्योगपतींना दिल्या जात आहे या कंपन्याचे दिवाळे निघाल्यास त्याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसल्याशिवाय राहणार नाही कित्येक उद्योगपतींना अब्जावधी रुपयाची कर्जमाफी करण्यात आली त्याचा परिणाम महागाईच्या रूपाने जनता सहन करत आहे या सर्व प्रकारावर मा राहुलजी गांधी यांनी संसदेत आवाज उठविला होता या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणून. त्यांची खासदारकी रद्द करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा घनाघाती आरोप महिला काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ संजीवनी बिहाडे यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच,पत्रकार पंकज भारसाकळे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देतांना त्या म्हणाल्या कि, राहुल गांधींना जर घर खाली करावे लागले तर त्यांना भारतामध्ये “मेरा घर ,राहुल गांधी का घर” असे म्हणनारे बहुसंख्य नागरीक पुढे येतांना दिसतील , असा विश्वास उत्तर देत असतांनी त्यांनी व्यक्त केला.आम्ही निडर होऊन संघर्ष करीत आहो तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहो असेही ते म्हणाल्या. त्यावेळी डॉ अशोक बिहाडे,अतुल ढोले, राहणे विधीज्ञ ,हुकुमचंद शर्मा यांनी ही आयोजित पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांत देशमुख, रामदास कोरडे, सतीश इंगळे, व्ही व्ही कुमकर, फिरोज खान, तेल्हारा महिला काँग्रेस अध्यक्ष रजिया पटेल, अफरोज खान पठाण तेल्हारा तालुका अध्यक्ष ,युवक काँग्रेसचे सचिन पोहरकार तसेच भोपळे आदी उपस्थित होते या पत्रकार परिषदेचे आयोजन संदीप भाऊ खारोडे तेल्हारा काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी केले




