बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

केंद्रातील हुकूमशाहीवृत्ती च्याभाजपा सरकार विरुद्धकाँग्रेसपक्ष रस्त्यावर उतरणार-पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा पत्रकार परिषदेमध्ये इशारा

. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकरकेंद्रामधील नरेंद्र मोदी यांचे हुकूमशाही वृत्ती च्या सरकार विरुद्ध देशातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून या शासनाविरुद्ध काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी शेगाव येथे विश्राम भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला आहे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने एका मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासाच्या आतच त्यांचे लोकसभा सदस्य पद खारीज करण्यात आले केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे शासनाकडून अदानी यांच्या भ्रष्टाचारा बद्दल माननीय राहुलजी गांधी यांनी संसदेत आवाज उठवू नये याकरिता सुळबुद्धीने राहुल गांधी यांच्या विरोधात मोदी शासनाने कारवाई केल्याचा आरोप ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेला उपस्थित काँग्रेस सेवा दलाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिंग चव्हाण यांनी बोलताना सांगितले की केंद्रात नरेंद्र मोदी यांचे भ्रष्ट व हुकूमशाही वृत्तीचे सरकार असून देशातील लोकशाही या शासनाने संपुष्टात आल्याचा आरोप तेजेंद्र सिंग चव्हाण यांनी यावेळी केला केंद्र शासनाच्या अशा हुकूमशाही व हिटलरशाही वृत्ती विरोधात तसेच संविधान व लोकशाही वाचविण्याकरिता काँग्रेस पक्षातर्फे लवकरच ग्राम स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत प्रत्येक ठिकाणी तीव्रजण आंदोलन उभारल्या जाणार असल्याचाही इशारा यावेळी ते चंद्रसिंग चव्हाण यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला शेगाव शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किरण बापू देशमुख काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कैलास बापू देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर जयंतराव खेडकर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल ठाकरे पाटील, काँग्रेस सेवा दलाचे शेगाव तालुका अध्यक्ष अनिल साबळे, युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी पवन पचेरवाल महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव कविता राजवैद्य, सविता झाडोकार, निखिल देशमुख पुरुषोत्तम कराळे, गोपाळ कलोरे चंद्रकांत माने, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button