बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल १६१ अर्ज दाखल….

जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

निवडणुकीत शेवटच्या तारखेपर्यंत १६९ अर्ज दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दोन दिग्गजांनी परस्परविरोधी पॅनल उभी केली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे पैनल कुणाच्या नेतृत्वातील असा संभ्रम निवडणुकीपूर्वीच निर्माण झाला आहे.

आरक्षणनिहाय

जळगाव जामोद : १८ जागांसाठी १३६ उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवार सर्वसाधारण

६५

जळगाव जामोद : जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १०: निवडणुकीसाठी १८ संचालक पदाच्या जागा असून यासाठी आज शेवटच्या दिवशी तब्बल १२३ उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यापूर्वी २३ अर्ज दाखल

महिला

इतर मागास प्रवर्ग

११

भजविज्ञा

झाले होते. असे एकूण आता १३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटात सात जागांसाठी ४६ अर्ज, महिला राखीव दोन पदासाठी १२ अर्ज तर इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या एका जागेसाठी २० तर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या एका जागेसाठी ६ अर्ज दाखल झाले आहेत असे एकूण सेवा सहकारी संस्था मतदार संघात १२ जागांसाठी ७४ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटात दोन जागेसाठी २५ नाम निर्देशनपत्र तर ५४ अनुसूचित जाती जमाती गटातील एका जागेसाठी ८ अर्ज तर आर्थिक दृष्टया दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी ११ अर्ज असे एकूण ग्रामपंचायत मतदार संघात चार जागेसाठी ४४ अर्ज दाखल झाले आहेत.

एकूण

१२

ग्रामपंचायत मतदारसंघ

सर्वसाधारण

34 १४

अनु. जाती-जमाती

आर्थिकदृष्ट्या दुर्बल

घटक ०५

एकूण

अडते व्यापारी मतदारसंघ १२ हमाल मापारी मतदारसंघ २१

खामगाव येथील कृउबास निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर सोमवारी सर्वच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांसह सूचक अनुमोदकांची एकच भाऊगर्दी झाली होती. अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांनी परस्परविरोधी पॅनल उभी केली आहेत.

व्यापारी व अडते मतदारसंघात दोन जागेसाठी २९ अर्ज तर हमाल व मापारी मतदारसंघात एका जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले आहेत असे एकूण २८ जागेसाठी १३६ अर्ज दाखल झाले आहेत. एकूणच अर्जाची संख्या ही खूप मोठी असल्याने आता तब्बल पंधरा दिवसात किती उमेदवारी अर्ज मागे होतात यावरच पुढचे निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे. एकूणच दोन पॅनलमध्ये अवर चुरस होईल अशी सध्याची स्थिती दिसून येते,

दरम्यान, दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीचे पॅनल आपल्याच नेतृत्वातील असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली असतानाच नेत्यांच्या परस्परविरोधी पॅनलमुळे विरोधकांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button