जळगावा जिल्हा

‘आयुक्त हटाव-जळगाव बचाव’ स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव । प्रतिनिधी

शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटविण्याच्या मागणीसाठी ‘आयुक्त हटाव-जळगाव बचाव’ स्वाक्षरी मोहिमेची सोमवारी, ८ डिसेंबर रोजी कोर्टासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुरुवात करण्यात आली. ‘जळगाव प्रथम’ अराजकीय व्यासपीठातर्फे सुरू केलेल्या मोहिमेला जळगाव महानगरपालिकेच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. मोहिमेची दखल प्रमुख इलेक्ट्रॉनिक मीडियांनी घेतली आहे. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

याप्रसंगी जळगाव प्रथमचे संस्थापक संयोजक तथा माजी आमदार अॅड. जयप्रकाश बाविस्कर, समाजसेवक शिवराम पाटील, अॅड. संदीप पाटील, अॅड. सागर शिंपी, अॅड. जमील देशपांडे, जळगाव वकील बार

असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, अॅड. धीरज पांडे, अॅड. आर. के. पाटील, अॅड. काबरा, अॅड. नितीन जगताप, अॅड. जहांगीर, अॅड. दीपक सपके, अॅड. मनीष पाचपोळ, अॅड. सीमंतिनी कुलकर्णी, अॅड. सुरेखा पाटील, तसेच विशाल सोनार, सुरेश पांडे, राकेश वाघ, मुकुंदा रोटे, श्री. मंडोरे, श्री. राठी, श्री.चोरडिया, श्री. नेसते, मुजुमदार, कुलकर्णी, डी. वाय. पाटील, ललित शर्मा, अनिल नाटेकर, मनोज वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाक्षरी मोहीम ९ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी १० ते १२ या वेळेतही सुरू राहणार आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी नागरिकांची एक स्वाक्षरी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांनी एकजुटीने पुढे येत मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव प्रथमचे संस्थापक संयोजक अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button