महिला बाल कल्याण मंत्री ना लोढा यांचा माविमचे राजेश नागपूरे यांच्या हस्ते सत्कार

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगाव : महाराष्ट्र राज्याचे पर्यटन तथा महिला व बाल कल्याण मंत्री ना मगलप्रभात लोढा यांचा महिला आर्थिक विकास महामंडळ वाशीमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे यांच्या हस्ते पुचच गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.ता २१ रोजी शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर येथे राज्याचे मंत्री मा.ना मंगलप्रभात लोढा आले असता माविम वाशीम कार्यालयाच्यावतीने डीसीओ . राजेश नागपूरे यांनी त्यांचा सत्कार करून महिला आर्थिक विकास महामंडळ च्या कामाकाजाची माहिती सादर केली तसेच माविमच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत दि २४ ते २७ पर्यंत वाशीम येथील विठठलवाडी येथे नियोजित बचत गट उत्पादित वस्तूची विक्री प्रदर्शनी माहिती दिली यावेळी मत्री लोढा यांनी माविमच्या कार्याबदल समाधान व्यक्त करून प्रदर्शनी करीता शुभेच्छा दिल्या . यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे यांच्या सह माहिती अधिकारी विवेक खडसे ‘ लोकसंचालित साधन केंद्र मालेगाव २ चे व्यवस्थापक शरद व्ही कांबळे उपस्थित होते.



