महाराष्ट्र

तेल्हारा तालुक्यात कलापथकाद्वारे जनजागृती अभियान*

*तेल्हारा तालुक्यात कलापथकाद्वारे जनजागृती अभियान*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता. प्रतीनीधी विजय घोडे. तेल्हारा तालुक्यातराष्ट्रीय सांस्कृतिक लोककला मंचच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.दिनांक 9/3/2023 पासून हे जनजागृती अभियान तेल्हारा तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात आले. जनजागृती कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष जिल्हा परिषद अकोला तालुका जिल्हा अकोला तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत समाज कल्याणाच्या विविध योजनांबाबत राष्ट्रीय सांस्कृतिक लोककला मंच तेल्हारा तालुका तेल्हारा जिल्हा अकोला महाराष्ट्र यांच्या माध्यमातून शाहिर मुरलीधर लोणाग्रे सह ढोलकी वादक श्याम कुमार मोहे, हार्मोनियम महादेवराव मिरगे, कोरस गोपाल जी वाघ, रामाभाऊ कोरडे ,अंकुश सुलताने, सुभाष भिवटे, मार्तंड घुले यांच्या सहकार्याने हे जनजागृती अभियान संपन्न केले,या जनजागृती च्या कार्यक्रमांमध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने राजर्शी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना व देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना,अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आश्रम शाळा योजनेबाबत ,शासकीय निवासी शाळा योजनेबाबत, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची विविध कल्याणकारी योजनेबाबत जनजागृती तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी काम करणारी आर्थिक विकास महामंडळांबाबत माहिती दिली महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ मुंबई, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई ,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित मुंबई. इत्यादी महामंडळांबाबत माहिती दिली तसेचविविध विभागामार्फत मिळणारे पुरस्कार व पारितोषिके बाबत माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार ,संत रविदास महाराज पुरस्कार ,छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, फुले पुरस्कार ,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार इत्यादी पुरस्काराबाबत जनजागृती केली तसेच स्वच्छता भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती केली कार्यक्रमाची सांगता तेल्हारा बस स्थानक येथे करण्यात आली त्यावेळी तेल्हारा एसटी महामंडळ चे महाले साहेब पांडे साहेब सह इतर कर्मचारी तसेच प्रवासी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button