बुलढाणामहाराष्ट्र

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) औरंगाबाद जिल्हा समितीच्या वतीने आयोजित प्रा.अजित अभ्यंकर यांचे विशेष व्याख्यान संपन्न

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI)औरंगाबाद जिल्हा समितीच्या वतीने शहरातील गांधी भवन येथे ‘अदानी प्रकरणाचे राजकीय अर्थशास्त्र’ या विषयावर जेष्ठ अर्थतज्ज्ञ तथा कामगार नेते प्रा.अजित अभ्यंकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एसएफआय चे माजी नेते तथा प्राचार्य मा.योगेश खोसरे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर गांधी स्मारक निधीचे विश्वस्थ मा. मच्छीन्द्र गोरडे सर व एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. एसएफआय चे महाराष्ट्र राज्य संस्थापक सदस्य तथा कामगार नेते कॉम्रेड उध्दव भवलकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या विशेष व्याख्यान कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.’अदानी प्रकरणाचे राजकीय अर्थशास्त्र’ या विषयाची मांडणी करत असताना प्रमुख वक्ते प्रा.अजित अभ्यंकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा,उद्योगपती अंबानी,अदानी यांची अर्थ राजकीय रणनीती व अदानी ची बेकायदेशीर गुंतवणूक या मुद्द्यांना हात घालत अदानीची अवाढव्य व प्रचंड प्रमाणात वाढलेली संपत्ती ही कशा पद्धतीने बेकायदेशीर लूट आहे हे प्रा.अभ्यंकर यांनी सप्रमाण दाखवून दिले.त्याचबरोबर RSS-BJP प्रणित मोदी-शहा सरकार यांच्या राजकीय वरदहस्ताने ही जनतेची लूट केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.व्याख्यानाचा शेवट करताना प्रा.अभ्यंकर यांनी या लुटी विरोधात जनतेला जागृत करण्यासाठी विविध जनसंघटनांनी पूर्ण ताकतीने ‘कॅम्पेन मोड’ वर यायला हवं व जनतेत जाऊन या जनविरोधी भांडवलदार व सरकार विरोधात जनमत एकत्र करण्याची आवश्यकता बोलून दाखवली.तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले प्राचार्य योगेश खोसरे यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना ‘अदानी प्रकरणाचे राजकीय अर्थशास्त्र’ या विषयाच्या अनुषंगानेच एसएफआय सारख्या विद्यार्थी संघटनेची भूमिका व कार्याची प्रशंशा करताना अशा विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी अशा विषया संबंधीत सातत्याने विविध उपक्रम व कार्यशाळा राबवायला हव्यात असे मत त्यांनी व्यक्त करून कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.या कार्यक्रमाचे प्रास्तविक एसएफआय जिल्हा सचिव अशोक शेरकर यांनी केले व सूत्रसंचालन अनुजा सावरकर तर आभार प्रदर्शन आकाश जाधव यांनी केले.या वेळी या कार्यमासाठी किसान सभेचे नेते भगवान भोजने,ऍड.बाबासाहेब वाव्हळकर,सतीश कुलकर्णी,एसएफआय चे माजी राज्याध्यक्ष दादासाहेब शिंदे,माजी राज्य सहसचिव नितीन वाव्हळे,एसएफआय चे माजी विद्यार्थी नेते सुनीता लोंढे,सीमा शिंदे,रमेश जोशी,अभिमान भोसले यांची विशेष उपस्थिती होती त्याच बरोबर शहरातील विविध कॉलेज व विद्यापीठातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साठी एसएफआय जिल्हा समिती पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.यामध्ये मनीषा बल्लाळ,गणेश अलगुडे,प्रतीक बोर्डे,मुनिर सय्यद,ऋतुजा जोगडे,श्रीनिवास लटांगे,रेखा काकडे,अरुण मते,कृष्णा रकटे,ललित बडगुजर,अरुणा गायकवाड,वैशाली पाईकराव,पवन मानवतकर,आरिफ शेख,सतीश खोडवे,मुकुंद वाघ,नितीन चव्हाण यांचा समावेश होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button