खिरोडा येथील संगीत शिव महापुराण कथा महायज्ञ व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता..

खिरोडा येथील संगीत शिव महापुराण कथा महायज्ञ व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगांव- बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालु्यातील खिरोडा गाव येथे श्री हनुमान मंडळ, खिरोडा येथे संगीत शिव महापुराण कथा महायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन २५ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान् करण्यात आले होते. या अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवार दिनांक ०४ मार्च रोजी सांगता झाली.
दरवर्षी खिरोडा येथे श्रीमद भागवत कथा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी शिव महापुराण कथा महायज्ञ व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक ४ मार्च रोजी सांगता झाली. या सप्ताहाचे ह.भ. प.श्री शालीग्राम महाराज चीतोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले काल्याचे कीर्तन आणि खिरोडा येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होऊन सांगता झाली. संध्याकाळी टाळ मृदंगाच्या निनादात “ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात भाविकांनी गाव प्रदक्षिणा निघाली होती. खिरोडा येथील श्री हनुमान मंडळाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात सात दिवस भागवताचार्य, कथावाचक हभप शालीग्राम चितोडेकर महाराज, जळगांव खानदेशकर यांनी संगीतमय शिवमहापुरण कथा अमृतवाणीत भाविकांना भगवत भक्तीत तृप्त केले. तसेच दैनंदिन कीर्तन, भजन, हरिपाठ, काकड आरती, हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



