विदर्भ

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेत 20 हजार पेक्षा कमी रक्कम घेण्यास व देण्यास नकार

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेत 20 हजार पेक्षा कमी रक्कम घेण्यास व देण्यास नकार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगांव:-कोणतेही आदेश नसताना सामान्य ग्राहक,वयस्कार,अपंग ग्राहकाना नाहक त्रास म्हणून शेगांव येथील दोन्ही ब्रांच मध्ये 20 हजार किंवा त्या खालील रक्कम तेथील रोखपाल आणि शाखाधिकारी रोख रक्कम घेत नाही, उलट ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला देतात. परंतु गांधी चौक शेगांव शाखा परिसरात भारतीय स्टेट बँक चे कोणतेही ग्राहक सेवा केंद्र नाही. रोख रक्कम घेणे व देणे या साठी कोणतेही वरिष्ठ अधिकारीचे आदेश नसताना सुद्धा नाहक ग्राहकाना त्रास देण्याचा प्रकार वरील शाखेत सुरु होता. त्या बद्दल केंद्र सरकार च्या CP GRAM या पोर्टल वर व माननीय लोकपाल भारतीय स्टेट बँक याना तक्रार करताच रु.20 हजार पेक्षा कमी रक्कम घेणे व देणे ही सुविधा शाखेत सुरु असल्याचा EMAIL शाखाधिकारी द्वारे मला पाठविन्यात आला. नाहक ग्राहकाना त्रास देणाऱ्या रोखपाल व शाखाधिकारी विरुद्ध तक्रार नोंदवताच त्याची दखल घेण्यात आली. सर्वांच्या सुविधे करिता दि.४ मार्च २०२३ पासून बँक परिसरात ग्राहक सेवा केंद्र सुद्धा तात्काळ सुरु करण्यात आले असून काही तक्रार व बँकच्या कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या कडून कायदा सोडून जबरदस्ती कोणतेही आदेश नसताना त्रास होत असल्यास ऑनलाइन तक्रार नोंदवावी.सदर तक्रार ईमेल द्वारे केल्याची कॉपी आणि बँकेकडून प्राप्त ईमेलची प्रत सोबत आपल्या माहिती साठी जोडली आहे.

तक्रार कर्ता
रितेश ओमप्रकाश खेतान
गांधी चौक, शेगांव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button