मुक्ताईनगरराजकीयसामाजिक

राष्ट्रवादी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

राष्ट्रवादी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव –

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा व महानगरच्या वतीने शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटिल यांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी श्रीराम माध्यमिक विद्यालय , मेहरूण येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिजाऊ , छत्रपती शिवाजी , शिवकालीन मावळे व स्त्रिया , आदींच्या वेशभूषा केलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील शौर्य प्रसंगाचे पोवाडे सादर करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष , वाल्मिक पाटिल , युवक अध्यक्ष रिकू चौधरी , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बहारे , राजू मोरे , अमोल कोल्हे , किरण राजपूत , रहीम तडवी , संदीप पाटिल , अनिरुद्ध जाधव , गणेश पाटिल , अशोक सोनवणे , जयश्री पाटिल , मिनाक्षी चव्हाण , मिनाक्षी देशमुख , प्रमोद पाटिल , सुहास चौधरी , राजू बाविस्कर , राहुल टोके , प्रविण धनगर , नामदेव पाटिल , चेतन पवार , भीमराव सोनवणे , संतोष चाटे , कृष्णा सानप यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button