महाराष्ट्रसामाजिक

तेल्हारा येथे श्री गौतमेश्वर संस्थान मध्ये भागवत कथेची सांगता

तेल्हारा येथे श्री गौतमेश्वर संस्थान मध्ये भागवत कथेची सांगता
 विजय घोडे. 
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा शहरामध्ये गौतमा नदी किनारी वसलेले श्री गौतमेश्वर महादेव मंदिर आहे,हे मंदिर प्राचीन असून येथे महाशिवरात्री निमीत्ताने भागवताचार्य श्री व्यासजी महाराजांच्या अमृतवाणीतुन भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.  दि. 18/02/2023  ला  कथेची सांगता करण्यात आली. या भागवत कथेला भाविकं  मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिराची सुंदर सुरेख अशी सजावट करण्यात आली असून ,या प्राचीन गौतमेश्वर शिव मंदिराचे जिर्णोद्धारचे कार्य सुरू आहे ,मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी भाविकं मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत, मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे साहित्यही देणगीदार देत असल्याने जिर्णोद्धारचे कार्य अतिशय जलदगतीने पूर्णत्वास जात आहे. विशेष बाब ही कि, मंदिराच्या कळसाला  फक्त  लेकीबाईचीच वर्गणी घेण्याची प्रथा आहे.

आज दि.19/02/2023 रविवारला महाशिवररात्री निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . त्याकरिता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या हितास्तव भव्य मंडप उभारण्यात आला असून महिलांकरीता वेगळा मंडप उभारण्यात आला होता. महाप्रसाद  घेतल्यानंतर त्या भाविकाने  निदान  एका तरी पंगतीला वाड करावा अशी सूचना वारंवार  देण्यात आली असल्याने भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही, कमि वेळेत  हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.हा महाशिवरात्री महोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्या करीता  श्री गौतमेश्वर शिव भक्त मंडळ तसेच ईतर भक्तांनीही  अथक परिश्रम घेतले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button