निर्माल्यांतुन निर्मितीकडे*

*स्वच्छता अभियान शेगावस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरसूर्योदय कृषी व बहुउद्देशिय संस्था व अनुभव सार्वजनिक वाचनालय टाकळी (निमकर्दा ) जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपली भूमाता, पाणी, हवा प्रदुषित होण्यापासून कशी वाचविता येईल यासाठी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन आम्ही काही उपक्रम हाती घेतले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानें मंदीरातील निर्माल्य हार फुले, बेल व वनस्पती यापासून जैविक,सेंन्द्रीय खत, दशपर्णी अर्क तयार करण्याचामानस हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्या भूमातेमध्ये रासायनिक खते व रासायनिकऔषधांचा अतिरेक वाढल्यामुळे मानवी जीवनावर तसेच प्राणीमात्रावर होणारे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी मदत होईल. त्यासाठी प्रत्येक नगरामध्ये ज्याठिकाणी पुजाअर्चा चालते. त्याठिकाणी संस्थेच्या वतीने एक एक बॉक्स ठेवला आहे. ठिकाण या संस्थांच्या अध्यक्ष तथा कार्यकारी मंडळानी तथा ग्रामस्थ तथा महिला मंडळाची सभा घेवून त्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून दिले व पुजासाहित्य मंदीर परिसरात इतरत्र कुठेही न टाकता ठेवलेल्या बाक्स मध्ये टाकण्याची विनंती केली. दर दोन दिवसात बॉक्स खाली करून सगळीकडील निर्माल्य एकत्र करण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. त्याअनुषंगाने सांप्रदाय नगर शेगाव मधील जय हनुमान मंदीर तथा शिवलिंग मंदीरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनाच्या दिवशी दिनांक 13/02/2023 ला सुर्योदय कृषी व बहुउदेदशीय संस्था आणि अनुभव सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष श्री्. निळकंठ भास्करराव साबळे यांनी निर्माल्य व्यवस्थापन बॉक्स जय हनुमान मंडळाचे अध्यक्ष श्री जगतराम गावंडे, सचिव श्री श्रीकृष्ण खराटे सहसचिव श्री दिलीपजी अरबट, उपाध्यक्ष श्री. विलासराव सुलताने ,संस्थानचे मार्गदर्शक श्री प्रल्हादजी सुलताने यांच्या स्वाधीन केला.तसेच खामगाव रोड वरील रोकडीया हनुमान मंदिरांत चहापाणी देऊन मंदिरातील महाराजवअग्रवालजी,जाभंळे,असंख्य भक्तासमेवेत निर्माल्यबाक्स स्वाधिन केला.दत्तवाडीतील श्रीसंकटमोचन हनुमान मंदिराचे आरती मंडळाला तील वासुदेवराव ढगे, भास्करराव डोसे, देवलाल ढगे, अकुंश पाटील,नरेश दाभाडे, योगेश अग्रवाल, पुरुषोत्तम गरदडे, अनिलकुमार मुदलीयार, रामभाऊ निबांळकर,जगन्नाथराव डोंगे, सचिन कंडाळे,सोमेश दहीवाले निर्माल्य बाक्स यांच्या स्वाधीन करून सर्वांनां पर्यावरण रक्षणास मदत करण्याची विनंति केली. तिनही मंदिराच्या कार्यकारी कमेटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष निळकंठ भा. साबळे यांनी निसर्ग रक्षणीय काम हाती घेतले या स्तुत्यउपक्रम साठी सहकार्य राहील असे वचन देऊन विषेश आभार मानले



