मानेगाव येथे कापसाच्या वजनात हेराफेरी करणाऱ्या बेपाऱ्याला पकडले

दलाल व व्यापाऱ्याचे साठे लोटे
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव तालुक्यातील मानेगाव येथे 17 फेब्रुवारी रोजी कापसाच्या बेपाऱ्याने मानेगाव येथील संजू लावडे या कास्तकाराचा कापूस घेत असताना वजन काटा मारल्याचे चित्र दिसून आले.25 किलो वजनाच्या फारीमागे अर्धा किलो कापसाची लूट हा व्यापारी करत होता. संजू लावाडे मानेगाव या कास्तकाराचा कापूस खरेदी करण्याकरता भाकराबाचा बेपारी माळी व दलाल भीमराव तायडे निंबा यांनी बोलेरो पिकप वाहन क्रमांक MH २८ EL ८३९१ या क्रमांकाचे वाहन गावात आणून कास्तकाराचा कापूस लुटला. त्यादरम्यान गावातील जागरूक नागरिकांच्या व्यापारी कापूस लुबाडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावात बोभाटा झाला. प्रतिक्रिया_शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सदर प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले तर ग्रामीण भागातील खेड्यांवर अशा लुचाड व्यापाऱ्यांकडून कास्तकारांची लुबाडणूक होणार नाही.मनोहर रहाटे. मानेगाव. शेतकरी.



