जिल्हा परिषद शाळा शिरधाणे प्र.नेर येथे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय जल्लोषात संपन्न..

*जिल्हा परिषद शाळा शिरधाणे प्र.नेर येथे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय जल्लोषात संपन्न…*~~~~~~~~~~~~~~~~~~
*धुळे:-* धुळे तालुक्यातील शिरधाणे प्र.नेर येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय जल्लोषात संपन्न.शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सरपंच सुरेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी दिनेश भदाणे माजी उपसभापती पं.स.धुळे,अर्जुन गायकवाड पं.स.सदस्य,उपसरपंच भालचंद्र भदाणे माजी सरपंच जिभाऊ पाटील निंबाआण्णा भदाणे पांडूरंग भदाणे अशोक भदाणे,माजी उपसरपंच गोरख भदाणेमच्छिंद्र शेलार अध्यक्ष शा.व्य.समिती मदन पाटील उपाध्यक्ष शा.व्य.स पुंडलिक जाधव माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीगोरख पाटील अध्यक्ष गाव तंटामुक्ती मुख्याध्यापक रामकृष्ण शिंदे सामाजिक कार्यकर्तेज्ञानेश्वर महाले,भगवान भदाणे,निसारभाई पठाण, सुकलाल बागूल,बापू भदाणे,शंकर भदाणे,नितीन भदाणे नितीन सोनवणे संजय भदाणे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. यावेळी हिंदी मराठी अहिराणी गीते,लोककला लावणी देशभक्तीपर गीत आदिवासी नृत्य,सामाजिक प्रबोधनपर विविध विषयांवर त्यात व्यसनमुक्ती,पर्यावरण संवर्धन,तंबाखू मुक्त भारत,प्लास्टिक बंदी,पाण्याची बचत,जीवनातील शिक्षणाचे महत्व इत्यादी विषयांवर फ्लँश कार्ड थीमद्वारे बोधपर संदेश देण्यात आले.तसेच विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळवली. प्रत्येक नृत्यावर ग्रामस्थ पालक तरूण मित्र यांनी भरभरून प्रतिसाद दिला.विशेष आकर्षण नन्हा मुन्ना राही हुँ..!शिवबा आमचा मल्हारी..!तेरी मिट्टी मे मिल जावा..!लक्ष्मी बम बम भोले..!!जलवा तेरा जलवा..!ओमकार स्वरूपा दिप नृत्य..!श्रीवल्ली तुना,आपली यारी..!दिलबरो सामाजिक संदेश फ्लॅशकार्ड थीम इत्यादी.स्नेहसंमेलनास धुळे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे शिक्षण विस्तार अधिकारी संजीव विभांडीक केंद्रप्रमुख अपर्णा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन विशाल परदेशी अमित शेख यांनी केले.आभार भरत चौधरी यांनी मानले.यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामकृष्ण शिंदे शिक्षक संजय पाटील भावना सोनवणे आनंदा अहिरे देवेंद्र परदेशी शितल धुमाळ यांनी परिश्रम घेतले…



