वाण धरणातिल हक्काच्या पाण्यासाठी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाला स्वाभिमानीचा पाठींबा.

*वाण धरणातिल हक्काच्या पाण्यासाठी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाला स्वाभिमानीचा पाठींबा.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
अकोला : बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाण धरणातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी बाळापुरात नेऊ नये अशी मागणी करत शेतकरीपुत्र दिपक इंगळे व शरद अवचार यांच्या सह शेकडो शेतकऱ्यांनी तेल्हारा तहसिल समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी भेट देत संघटनेच्या वतिने जाहीर पाठिंबा दिला आहे. उपोषणकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असुन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शासनाने उपोषणाची दखल न घेतल्यास लवकरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा भडका उडेल याचे परीणाम सरकारला भोगावे लागतील असा ईशारा प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला आहे. यावेळी स्वाभिमानीचे उज्वल पाटील चोपडे,विजय ठाकरे,गोपाल तायडे,रोशन देशमुख यांच्या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.



