कोश्यारींचा प्रतिकात्मक निरोप समारंभ करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जल्लोष

*जळगाव – महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांच्यासह ईतरही राष्ट्रपुरुषांविषयी आणि मराठी जनतेविषयी सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्रद्वेषी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला व महाराष्ट्रात नविन राज्यपालांची नियुक्ती केली. सदर वृत्त कळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांना पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी भगतसिंग कोश्यारींची वेशभूषा करून त्यांचा प्रतिकात्मक निरोप समारंभ देखील करण्यात आला . कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करताच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वेळोवेळी आंदोलन करण्यात आलेले होते. तसेच कोश्यारी जळगाव दौऱ्यावर आलेले असतांना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला होता . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या आंदोलनांना अखेर यश मिळाले . महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्या व मराठी जनतेला दुखवणाऱ्या कोश्यारींची सावली देखील आता महाराष्ट्र पडायला नको अशा तीव्र भावना यावेळी कार्यकर्त्यांच्या होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगावचे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी , अमोल कोल्हे , राजू मोरे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, रहीम तडवी, रमेश बाऱ्हे, सुशील शिंदे, साहिल पटेल, रफिक पटेल, नरेंद्र शिंदे, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, योगेश कदम, चंदन कोळी, योगेश साळी, सचिन साळुंखे , आकाश हिरवाडे , हितेश जावळे, विनोद धुमाळे, विशाल देशमुख , जुबेर खाटीक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



