पांगरी नवघरे येथे गीता ज्ञान विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेल न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड मालेगांव : – पांगरी नवघरेः१० पांगरी नवघरे येथील गितान्यान विद्यामंदिर विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले मुलांना काहीतरी भविष्य घडवण्यासाठी व शिक्षणाच्या भक्तीतून काहीतरी मुलांचे मनोरंजन व्हावे यासाठी वर्षाअखेर दरवर्षीप्रमाणे शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रमाद्वारे शाळेतील मुलांना त्या स्पर्धेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपले कला गुणवत्ता दर्शविता,पांगरी नवघरे येथील नर्सरी केजी वन केजी टू नर्सरी या वर्गातील मुलांनी अप्रतिम असे नृत्य सादर करून गावकऱ्यांचे पाठो पाठ मान्यवरांना ही दंग करून सोडले कार्यक्रमाचे उद्घघाटन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक,पंडीतनवघरे यांच्या हस्ते पार पडले असून कार्यक्रमाला बुलढाणा अर्बन वरीष्ठ कर्मचारी संघ,जि,प सदस्य,ऊपसभापति,तथा पंचक्रोशीतिल गावचे प्रथम नागरिक सरपंच पांगरी नवघरे,सरपंच मसला, सरपंचखडकी,सरपंच अमानि,सरंपंच शेलगाव इंगोले,psiअभिषेक नवघरे, प्रकाश पाटील लहाने,दत्तात्रय शिंदे,तथा गावातिल प्रतिष्ठित नागरिक विविध क्षेत्रातील अग्रेसर मान्यवर शिक्षिका कर्मचारीव्रूंद अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तथा गीता ज्ञान सर्व कर्मचारी बांधव व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.



