जळगावा जिल्हानांदेड जिल्हावार्ताबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भसामाजिकसांस्कृतिक

अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्राच्या संत परंपरेबद्दल काय माहित?जो भोंदू बाबा एक आव्हान मिळताच नागपुरातून पळून गेला त्यांनी उगाच अक्कल पाजळू नये. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या या बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई कधी करणार?

अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीला महाराष्ट्राच्या संत परंपरेबद्दल काय माहित?जो भोंदू बाबा एक आव्हान मिळताच नागपुरातून पळून गेला त्यांनी उगाच अक्कल पाजळू नये. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या या बाबाविरोधात भाजप सरकार कारवाई कधी करणार?बागेश्वरच्या धिरेंद्र शास्त्रीने संत तुकारामांची केलेली बदनामी संतापजनक आहे.जिजाई उर्फ आवली ही तुकोबांची पत्नी म्हणे त्यांना दररोज मारहाण करीत असे म्हणून ते रामजीन्चे भक्त झाले. हे अज्ञान आहे की अहंकारातून आलेला बेमुर्वतखोरपणा? विठ्ठल आणि राम यांच्यातला फरक ज्याला कळत नाही तो भंपकच असला पाहिजे.आवलीची बदनामी अशी नसली तरी ती भांडकुदळ होती, कर्कशा होती असे प्रभातच्या संत तुकाराम मध्येही दाखवले गेले.नी मग ही मिथक कथा बनवून मुद्दाम प्रचारीत केली गेली.मुळात तुकोबांच्या नावावर खपवण्यात आलेला हा अभंगच प्रक्षिप्त म्हणजे बनावट आहे. नंतर घुसवलेला आहे. तुकोबांच्या देहू प्रतीमध्ये” बरे झाले देवा बाईल कर्कशा !” ही ओळच नाहीये.ती अन्य पोथ्यांमध्ये नंतर मुद्दाम घुसवण्यात आलेली आहे. या निमित्ताने जिजाऊ (आवली) बद्दलचे आजवर पसरवले गेलेले असले सगळे भ्रम दूर केले जावेत. धिरेंद्र शास्त्रीचा तीव्र निषेध.स्वयंघोषित संत आसारामबापू याला बलात्कारप्रकरणी आज ( दि. ३१ ) जन्‍मपेठेची शिक्षा सुनावण्‍यात आली. या प्रकरणी मंगळवारी ( दि. ३०) त्‍याला गांधीनगर अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने दोषी ठरवले होते. आसारामची ही दुसरी शिक्षा आहे. 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी त्‍याला जोधपूर न्यायालयाने २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या ८१ वर्षीय आसामरामबापू जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.*काळ हा सर्वात मोठा न्यायाधिश आहे, सर्व गोष्टींचा अचूक निर्णय केल्यावाचुन राहात नाही…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button