महाराष्ट्रमुक्ताईनगर

एकलव्य संघटना मुक्ताईनगर यांच्यावतीने भगवान विर एकलव्य जयंती साजरी करण्याबाबत तहसीलदारांना दिले निवेदन

एकलव्य संघटना मुक्ताईनगर यांच्यावतीने भगवान विर एकलव्य जयंती साजरी करण्याबाबत तहसीलदारांना दिले निवेदन (दिनांक 29/1/2023 मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) सविस्तर वृत्त असे की पुढील महिन्यात 22/2/2023 रोजी भगवान वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यामध्ये मुख्यत्वे भिल्ल वाडा मुक्ताईनगर येथून महादंडनायक भगवान एकलव्य यांची भव्य मिरवणूक निघणार आहे भिल्लवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक पुढे मेन रोड ने प्रवर्तन चौकात पुढे ही मिरवणूक आनंद ट्रेडर्स तहसील रोड धनगर वाडा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह बस स्टॅन्ड प्रवर्तन चौक चौकातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून प्रवर्तन चौकात भगवान वीर एकलव्य प्रतिमापूजन आणि त्या ठिकाणी या मिरवणुक समारोपाचा कार्यक्रम होणार आहे अशा आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना देण्यात आले यावेळी भिल्ल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती पवार ,जिल्हा उपाध्यक्ष संजय वाघ, तालुका अध्यक्ष सुरेश मोरे सर ,तालुका उपाध्यक्ष दिनेश गायकवाड सर ,संघटनेचे तालुका सचिव भगवान भिल्ल सर ,तालुका सल्लागार रमेश पवार, तालुका सदस्य साहेबराव सोनवणे, पृथ्वीराज वाघ, किरण सोनवणे, अजय सोनवणे, करण सोनवणे असंख्य एकलव्य संघटना पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button