जळगावा जिल्हानिवडणूकबुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

संतनगरीचे रोहित देशमुख विद्यापीठाच्या शैक्षणिक समितीवरशेगांव

संतनगरीचे रोहित देशमुख विद्यापीठाच्या शैक्षणिक समितीवरशेगांव :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव माध्यमशास्त्र प्रशाळेच्या शैक्षणिक समितीवर संतनगरी शेगांवतील पत्रकार रोहित देशमुख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यापरिषदेच्या झालेल्या सभेत विद्यापीठ परिसरातील प्रशाळेसाठी स्वायत्तता प्रदान करण्यात आली. यासंदर्भात विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या ठरावाने माध्यमशास्त्र प्रशाळेकरीता शैक्षणिक समिती गठित करण्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनी मान्यता दिली आणि माध्यमशास्त्र प्रशाळा संचालक डॉ. भटकर यांनी नामनिर्देशनाने समितीवर दोन शैक्षणिक सत्रासाठी रोहित देशमुख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.समितीवर नियुक्तीने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आणि अनुभवाचा प्रशाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपयोग होईल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे.स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button