जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर शहरातील युवकांनी मकर संकांत केली आगळी वेगळी साजरी.

मुक्ताईनगर शहरातील युवकांनी मकर संकांत केली आगळी वेगळी साजरी.मुक्ताईनगर शहरातील पाच पुरुष मनोरुग्ण व दोन महिला मनोरुग्ण बऱ्याच दिवसापासून शहरात फिरतांना दिसत होते.त्यातील एक महिला मनोरुग्ण गावात रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाठी मागून नकळत चप्पल मारत असे.व एक पुरुष मनोरुग्ण हातात जाड लाकडी दांडा घेऊन अरे कारे करत पैसे मागून. त्या पैसाची दारू पीत असे.धनंजय सापधरे व शुभम तळेले यांनी बोदवड येथील आत्म सम्मान फोंडेशन ची माहिती घेत डॉ. विजय पाटील यांच्या सोबत संपर्क साधला भेट घेतली त्यांचे कार्य पहिले खरंच मानव सेवेत परमेश्वर सेवा मानणारी आत्म सम्मान फोंडेशन बोदवड ची टिम!खरंच येथे मनोरुग्णना सन्मान पूर्वक वागणूक देऊन औषध उपचार करून त्यांना सक्ष्यम तंदुरुस्त स्वच्छता पीर्य व्यक्ती म्हणून मनोरुग्ण तेथे चांगले होतात. नंतर त्यांच्या सोबत प्रेमाणे बोलून चौकशी विचारपूस तपास करून त्यांना त्यांच्या घरी नातेवाईकांन जवळ पोहोचले जाते.या कामासाठी महिला व पुरुष यांची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यांची सर्व सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे अंघोळ चहा नास्था जेवण औषध त्यांच्या सोबत खेळ खेळणे मनोरंजनासाठी टिव्ही वरील कार्यक्रम पाहणे विचाराची देवाण घेवाण करणे त्यांच्या समस्या व आवडी निवडी समजवून घेऊन ते सोडवण्याच्या पुरवण्याच्या पर्यंत करणे.कुठल्याही गावातील बस्थानकातील रेल्वे स्थनकातील गली बोळातील मनोरुग्ण लहान मोठे महिला पुरुष आत्म सम्मान बोदवड येथे आणावेत त्यांच्या वरती संपूर्ण देखभाल व औषधो उपचारासाठी सशक्त तंदुरुस्थ निरोगी समानःपुर्वक आयुष्य जगण्यासाठी आणावेत असे आव्हान आत्म सम्मान फोंडेशन बोदवड करीत आहे.मुक्ताईनगर मधील खालील युवकांनी केली मद्दत सुनील उदे, राहुल पाटील, निलेश सोनटक्के, पंकज कोळी, तुषार माळी, रमेश कोळी बबलू देशमुख, मंगेश कोळी, मुकेश झाल्टे, शुभम पाटील,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button