बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखलीत अनुराधा स्कूलचा झेंडा फडकला!१००% निकालासह  अव्वल, सार्थक माळोदेची सुवर्णकामगिरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चिखली ( प्रतिनिधी) दिनांक :

येथील अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलने सीबीएससी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेने केवळ १००% निकालच लावला नाही, तर चिखली शहरातील सर्व सीबीएससी शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.या यशात सार्थक विजय माळोदे याने ९७.४०% गुण मिळवत चिखली शहरातील सीबीएससी शाळांमधून अव्वल येत शाळेचा गौरव वाढवला. त्याचप्रमाणे ओमंग गजानन लाघे (९३%) आणि गौरी केशव तळेकर (९२.२०%) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात भर घातली. इतर सर्व विद्यार्थ्यांनीही उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली.विशेष म्हणजे, मातृभाषा मराठी या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कल्याणी जायभाय, गौरी तळेकर आणि सार्थक माळोदे यांचा समावेश असून त्यांनी विशेष गुणवत्ता सिद्ध केली आहे.या घवघवीत यशामागे शाळेचे प्राचार्य बी. एम. जाधव, तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. प. रा. मौ. शि. संस्थेच्या सचिव अॅड. सौ. वृशालीताई बोंद्रे आणि संस्थेचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांच्या कार्याचेही मनापासून अभिनंदन केले.अनुराधा स्कूलच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button