कॉन्ट्रॅक्ट कामगारांच्या हितासाठी दसरखेड एमआयडीसीतील बँजो केमिकल कंपनीत चर्चा..!

दसरखेड : दसरखेड एमआयडीसी परिसरातील बँजो केमिकल कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांच्या विविध समस्या व हिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विजय भाऊ साठे यांनी कामगारांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या हक्क, सुविधा, सुरक्षितता तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर संवाद साधण्यात आला.
कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. कॉन्ट्रॅक्ट ठेक्यामध्ये असलेले कामगार कामाच्या ठिकाणी योग्य सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समस्या संबंधित व्यवस्थापनापर्यंत पोहोचाव्यात आणि कामगारांच्या हिताचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा करण्याचे यावेळी सांगण्यात आले.
या चर्चेला कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट मध्ये असलेले कामगारांची उपस्थिती होती. कामगारांच्या हितासाठी झालेल्या या चर्चेचे कामगारांनी स्वागत केले..!



