बोडखा/भिलखेड ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषास अभिवादन.विविध विकास कामावर चर्चा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.3/10/2026.
बोडखा भिलखेड., येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच एक विशेष कार्यक्रम आणि महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसंस्थाच्या उपस्थितीत देशाच्या व राज्याच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या महापुरुषांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भक्तिमय आणि उत्साहीत वातावरणात झाली. ग्रामपंचायत मुख्य सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एका विशेष समारंभात गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत महापुरुषांच्या प्रतिमेची मनोभावे आरती केली व पुष्पवृष्टी करून वंदन केले.
या मंगलमयी प्रसंगानंतर ग्रामपंचायतीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा. आणि इतर पायाभूत सुविधा आढावा यावेळी घेण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयतीचे सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, प्रामुख्याने हजर होते.
महापुरुषांचे विचार आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच बोडखा व भिलखेड परिसरात चा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र येऊन कटीबद्ध राहतील, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे समाजातील हिंदू/मुसलमान जाती भेद बाजूला ठेवून महात्मा गांधी जयंती निमित्ताने एकत्र येऊन गांधीजींना अभिनंदन करण्यात आले.
अत्यंत शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.



