महाराष्ट्रसामाजिक

रविकांत तुकाराम चा 15 फेब्रुवारीला गर्दे सभागृहात निर्धार मेळावा; तुपकर जेल मध्ये जाणार की बाहेरराहणार..? न्यायालयाच्या निकालाची उत्सुकता तर दुसरीकडे तुपकरांच्या घोषणांकडे लक्ष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विविध आंदोलने करूनही सरकार केवळ फसवी आश्वासने देत असल्याने, रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु रेल्वे रोको आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी रविकांत तुपकरांना केली होती. फैजदारी प्रक्रिया संहितेच्या १५१(३) अन्वये १८-०१-२०२४ रोजी तूपकरांना अटक करून १९-०१-२०२४
रोजी मा. न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी बुलढाणा यांचे समक्ष हजर करून १४ दिवस स्थानबद्ध ठेवल्यास विनंती केली होती.
मा. न्यायालयाने उभे पक्षांचे युक्तिवाद ऐकून पोलिसांची विनंती फेटाळून लावली व तुपकर यांची मुक्तता केली होती. त्या आदेशांनविरोधात पोलीस स्टेशन बुलढाणा शहर यांनी सत्र न्यायालय बुलढाणा येथे पूर्ण निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. यामध्ये त्यांना बाकी आंदोलनातील गुन्ह्यांमध्ये मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी ०७ फेब्रुवारी रोजी पहिली सुनावणी झाली तर ०८ फेब्रुवारी रोजी दुसरी सुनावणी झाली. रविकांत तुपकर स्वतः न्यायालयासमोर हजर झाले होते तर त्यांच्या वतीने सुविज्ञ पत्नी अँड. शर्वरी सावजी-तुपकर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. या संपूर्ण प्रकरणात दोन तास जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल १५ फेब्रुवारी रोजी येणार आहे. या प्रकरणाचा निकाल काहीही येऊ शकतो म्हणजे रविकांत तुपकर यांचा जामीन रद्द होऊन त्यांना तुरुंगात जावे लागू शकते किंवा मग त्यांची मुक्तता देखील होऊ शकते परंतु या निकालापूर्वी रविकांत तुपकर हे आपल्या समर्थकांशी संवाद साधणार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता गर्दे सभागृहात बुथ प्रमुखांच्या निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात रविकांत तुपकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे रविकांत तुपकर या मेळाव्याच्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे न्यायालयाचा निकाल काय लागतो
याबाबत देखील कमालीची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी हा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरणार असून या दिवसाकडे सर्वांची नजर आहे. तर या निर्धार मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांच्या पत्नी अँड. शर्वरी तुपकर यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button