बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशी 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांना रब्बी 2024 पीक विम्याची तातडीने भरपाई द्या!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेतकऱ्यांचे निवेदन; ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा

हिवरखेड (प्रतिनिधी)

तेल्हारा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे कपाशी,सोयाबीन, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे नुकसान होऊन नापिकी झाल्यामुळे तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना 50 हजार रुपये मदत तात्काळ द्यावी व शेतकऱ्यांना 2024रब्बी हंगामातील पीक विम्याची प्रलंबित भरपाई तातडीने मिळावी, या मागणीसाठी आत्मा समिती तेल्हारा तालुका अध्यक्ष तथा वाडी अदमपूर-जाफरापूरचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी, भाजपा तालुका अध्यक्ष गणेशराव वासुदेवराव रोठे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार,मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील प्रतिकूल हवामान व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तेल्हारा तालुक्यातील हरभरा, गहू तसेच इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी दाखल केल्यानंतर काही ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, नुकसान होऊनही तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित पीक विमा भरपाई मिळालेली नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे.
काही शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांची तातडीने चौकशी करून, पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रलंबित भरपाई विनाकपात व तातडीने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे अकोट, मतदार संघाचे
आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, खासदार अनुप धोत्रे,आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन देताना गणेश वासुदेवराव रोठे, रुपेश वल्लभदास राठी, रामुभाऊ राऊत, विठ्ठल पांडुरंग भाकरे, काशीराम कोतकार, संजय सोहनलाल राठी, अनिल नागोराव खारोडे, रघुनाथ घोराड, राजू पाटील वाघ, बबनराव भाकरे, अरुण पाटील रोठे, राजेश सदाशिव भाकरे, सुमित भाकरे, दीपक पंजाबराव गलोत सम्यक तायडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button