शेगाव तहसील इमारत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्यावर दंडात्मक कारवाई करा

शेगाव तहसील इमारत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्यावर दंडात्मक कारवाई करा
*वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर ची मागणी
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
“शेगाव तहसील ची इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारत बांधकाम चालू करण्यात आले होते सदर बांधकामाला 300 दिवसाचा कालावधी दिला होता परंतु ते काम 300 दिवस पूर्ण होऊन फक्त वटा लेवल पर्यंत झालेले असल्याने वंचित बहुजन आघाडीचे शेगाव शहर महासचिव आशिष खंडेराव यांनी सदर कॉन्ट्रॅक्ट दारावर दंडात्मक कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे,”
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर तहसिल कार्यालयाचे बांधकाम (ईमारत) ठरवुन दिलेल्या मुदतीमध्ये पुर्ण न केल्यामुळे कंत्राटदारास दंडात्मक कार्यवाही व कंत्राटदाराचा परवाना रद्द करणेबाबत चे निवेदन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर यांनी दिनांक 27, 7 ,2023 रोजी तहसीलदार तहसील कार्यालय शेगाव यांना दिले आहे
सदर निवेदनात शेगांव शहरातील तहसिल कार्यालय ईमारतीचे बांधकाम हे कंत्राटदार आर. के. संचेती यांना देण्यात आले. तहसिल इमारत बांधकामाचा कालावधी ३०० दिवसांचा ठरवुन हे काम देण्यात आले. दि.२२/०३/२०२२ पासून तहसिल इमारत बांधकाम चालु करुन ते दि. २२/०१/२०२३ पर्यंत पुर्ण करायचे होते. परंतु कंत्राटदाराने हे काम पुर्ण तर केलेच नाही, कंत्राटदाराने त्या बांधकामाची प्लिंथ (ओटा) सुध्दा पुर्ण केला नाही. कंत्राटदारास राजकीय अभय मिळत असल्यामुळे बांधकामात दिरंगाई होत असतांना दिसून येत आहे.
शेगांव तहसिल कार्यालयाची जागा ही स्थावर नसुन त्यासाठी त्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. आतापर्यंत तहसील कार्यालयाची जागा ही दोन ठिकाणी बदलून झालेली आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालय कोठे आहे हे सुद्धा बऱ्याच नागरिकांना माहित नाही जुन्या तहसील कार्यालयावर सेतू वाईंडर सर्वच असल्यामुळे तालुक्यातील नागरिक जुन्या तहसील कार्यालयावर येऊन आपले कागदोपत्री लिखापडी ऑनलाईन कामे करतात परंतु तहसील कार्यालयात जाण्यासाठी त्यांना शेगावात पायदल किंवा ऑटो रिक्षाने भटकावे लागते त्यामुळे शेगांव तालुक्यातील नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना, वृध्द नागरिकांना अतिशय हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेगांव तालुक्यातील नागरीकांना होत असलेल्या त्रासाबद्दल तहसिल कार्यालयाचे ईमारत बांधकाम कंत्राटदार आर. के. संचेती कारणीभूत असून कंत्राटदारास दंडात्मक कार्यवाही करून कंत्राटी परवाना रद्द करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर यांच्याकडून तहसीलदार शेगाव यांना देण्यात आले
सदर निवेदन देतेवेळी शेगाव शहर महासचिव आशिष खंडेराव, माजी शहराध्यक्ष प्रवीण भाऊ बोदळे ,शहर उपाध्यक्ष आशिष शेगोकार, शहर सहसंघटक मंगेश इंगळे ,शहर उपाध्यक्ष सोनुभाऊ अरदळे ,पवन चराटे सर ,धम्मा भाऊ इंगळे ,अशोक तायडे ,संतोष तायडे आदींची उपस्थिती होती



