हिरकणी महिला अर्बनची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात ..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
चिखली. ता. प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
सलग दोन वर्षे ‘दीपस्तंभ’ पुरस्कार मिळणे ही संस्थेच्या विश्वासार्हतेची पावती : ॲड. सौ. वृषालीताई बोंद्रे
चिखली : हिरकणी महिला अर्बनच्या सभासदकेंद्री आणि शिस्तबद्ध वाटचालीमुळे संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हाभरात संस्थेच्या २१ शाखा असून ठेवींमध्ये वर्षभरात तब्बल २६ कोटी रुपयांची वाढ झाली. सन २०२५ मध्ये ९६ कोटी रुपये असलेल्या ठेवी सन २०२६ मध्ये १२२ कोटी रुपयांवर पोहोचल्या. त्याचप्रमाणे कर्जवाटपातही भरीव वाढ नोंदविण्यात आली. २०२५ मध्ये ६९ कोटी रुपयांचे असलेले कर्जवाटप १५ कोटी रुपयांनी वाढून २०२६ मध्ये ८४ कोटी रुपये झाले. तसेच अमरावती विभागातून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा ‘दीपस्तंभ पुरस्कार’ मिळणे ही संस्थेच्या कार्याची आणि सभासदांच्या विश्वासाची पावती असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले.
महिला आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या हिरकणी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., चिखलीची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २६ सप्टेंबर रोजी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा ॲड. सौ. वृषालीताई बोंद्रे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे होत्या. दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सचिव कीर्तीताई सिसोदिया यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. इंगळे यांनी वार्षिक अहवाल सादर करून संस्थेच्या आर्थिक,प्रशासकीय व सामाजिक वाटचालीची माहिती दिली. पुढे बोलताना ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे म्हणाल्या की, आर्थिक प्रगतीसोबतच महिला सक्षमीकरण, आर्थिक शिस्त, शैक्षणिक प्रोत्साहन, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रमांना संस्थेने सातत्याने प्राधान्य दिले आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा समजून घेत त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेचे सूत्रसंचालन प्रा.पुनम घुबे यांनी तर आभार वंदनाताई इंगळे यांनी मानले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा त्रिवेणीताई प्रदीप हाके, सचिव सौ. कीर्तीताई हेमंत सिसोदिया, सविताताई वाघमारे, विद्याताई देशमाने,श्रीमती प्रमिलाताई जाधव, अनिताताई घुगे, वंदनाताई इंगळे, ॲड गीताताई भोजवानी, मालतीताई चवरे, मनीषाताई भुते,शानुताई श्रीवास्तव, कौसर फातिमा इर्शाद खान, ज्योतीताई फिस्के चंद्रभागाताई दामधर तसेच भारतीताई जितेंद्र बोंद्रे, सीमाताई गोपाल देव्हडे , नेहा नितीन गायके, आत्माराम देशमाने,प्रदीप हाके, कन्नूसेट भोजवानी, सर्जेराव भुते, प्रभुजी इंगळे, हेमंतसेठ सिसोदिया, डॉ. संजयजी घुगे, डॉ. इर्शाद खान,शिवदासभाऊ कापसे, सरदारसिंग, शामराव राजपूत कोलारा, प्रल्हाद महाराज म्हस्के, नामदेवभाऊ सदार, सुजाताताई बोंद्रे, उषाताई पंढरीनाथ टेकाळे, शोभाताई राजू बोडखे , शालिनीताई वानखेडे, लहाने सर व प्रकाश लकडे यांच्यासह विविध शाखांचे सल्लागार, अधिकारी-कर्मचारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमातून संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. तसेच महिलांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्यांसह सहभागी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. पूजा उमेश चवरे यांनी प्रथम, लक्ष्मी विजय देशमुख यांनी द्वितीय, तर निशा दीपक पिटकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा विशेष सत्कार
महिला व बाल विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे यांचा हिरकणी महिला अर्बनच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. आम सभा यशस्वी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले



