खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नांतून ८ कोटी ५० लाखांचा रस्ता पूर्ण…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, आवाज न्यायाचा
चिखली. ता. प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्याला यश, हतेडी बु. ते पांगरी रस्ता पूर्ण..

चिखली विधानसभा मतदारसंघातील हतेडी बु. ते पांगरी या ७ किलोमीटर लांबीच्या महत्त्वपूर्ण रस्त्याचे ८ कोटी ५० लाख रुपये खर्चातून संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागले असून, परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हतेडी बु. आणि पांगरी या दोन गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता असून, पाडळी दहीद, साखळी तसेच परिसरातील नागरिकांसाठीही तो महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे चिखली शहराशी जोडणारी वाहतूक अधिक सुलभ झाली असून, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करण्यासही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार श्वेता महाले पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सेंट्रल रोड फंडमधून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ८ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काम पूर्ण झाले.

चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील सातत्याने प्रयत्नशील आहेत. गावजोड रस्ते, शेतरस्ते आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून घेतला आहे.

चिखली मतदारसंघातील नकाशावर नसलेले अनेक रस्ते नकाशावर आणण्यासाठीही आमदार श्वेता महाले पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यापैकी अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामेही टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

हतेडी बु. ते पांगरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची मोठी अडचण दूर झाली असून, रस्ते विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा आमदार श्वेता महाले पाटील यांचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे…

रस्त्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल शेकडो  ग्रामस्थांकडून आयोजित सत्कार सोहळ्यात कुठेही फटाके, ढोल-ताशे, पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल-श्रीफळ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च करण्यात आला नाही. ग्रामस्थांनी साधेपणाने शब्दसुमनांनी आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, या खर्चाऐवजी शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ग्रामस्थांनी स्वतः वर्गणी जमा करून ती आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. ग्रामस्थांनी जपलेली ही माणुसकीची भावना पाहून आमदार श्वेताताई महाले पाटील भारावून गेल्या… विकासकामाचा आनंद साजरा करताना शेतकरी बांधवांच्या संकटाची जाणीव ठेवत मदतीचा हात पुढे करणाऱ्या हतेडी बु. ग्रामस्थांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. विजयराजजी शिंदे, श्री. सुनील देशमुख, श्री. दत्ता पाटील जिल्हा सरचिटणीस भाजप, श्री. युवराज भुसारी जिल्हा सरचिटणीस भाजप, श्री. मंदार बाहेकर शहराध्यक्ष भाजप, श्री. संतोष काळे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष, श्री. चंद्रकांत बर्डे जिल्हा उपाध्यक्ष भाजप, श्री. मोहन पवार अध्यक्ष खरेदी विक्री, श्री. सतीश पाटील भाकरे तालुका अध्यक्ष भाजप बुलडाणा, डॉ. श्री. कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, श्री. राहुल सवडकर, श्री. रिक्की काकडे, श्री. दत्ता सुसर सभापती पाणी पुरवठा, श्री. बाळू जाधव नगरसेवक, श्री. विलास चव्हाण, श्री. नीरज गायकवाड तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, श्री. मुकेश पडघान, श्रीमती अनुराधा भुसारी धाड मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा, श्री. मुन्ना बेंडवाल, सरपंच श्री. नागेश उबरहंडे, श्री. राजू नाटेकर, श्री. शुभम पडघान, श्री. सुनील बिलारी सरपंच केसापूर, श्री. पराग वाघ सरपंच चिखला, श्री. दत्ता शेवाळे, श्री. जितेंद्र तायडे उपस्थित होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button