बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री .संत जंगली महाराज मंदिर मोतीपुरा,नांदुरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ ,तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण

नांदुरा : श्री संत सद्गुरू जंगली महाराज यांच्या १०९ व्या पुण्यतिथीनिमित्त नांदुरा येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा श्री महादेव गो-रक्षण संस्थान, र. नं. ए २४५, नांदुरा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा प्रारंभ सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी होत असून सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगता होणार आहे. श्रीमद् भागवत कथा वाचन ह.भ.प. श्री दत्तात्रय महाराज अहिर, आसलगाव यांच्या रसाळ वाणीतून सकाळी ०९. ते १२ व ०३ ते०५ वेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. मधुकर महाराज आहेत.
सप्ताहादरम्यान विविध दिवसांमध्ये नामवंत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन होणार असून सकाळी काकडा, भागवत कथा तसेच सायंकाळी हरिपाठ व रात्री श्रीहरी कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ह.भ.प. श्री. दिनेश महाराज भामद्रे , कवठळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यानंतर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रा मंदिरापासून प्रारंभ होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी गायक, टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक तसेच हरिपाठ व काकडा मंडळींचे सहकार्य लाभणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विश्वस्त मंडळ, श्री महादेव गो-रक्षण संस्थान, नांदुरा तसेच श्री संत जंगली महाराज सेवाधारी उत्सव समिती मंडळ, नांदुरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात होणाऱ्या या सप्ताहाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button