खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्ररावेर
गुरुजी श्रीमंत झाले?…. पण शाळा मात्र अजूनही गरीबच आहे!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर: दि.१३/७/२६.(एक वैचारिक लेख )
काल परवा जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. एका पडता जीर्ण झालेल्या शाळेसमोरून जात होतो. तेवढ्यात शहरातून नव्या कोऱ्या चार चाकीतून. ते दृश्य पाहिलं आणि मन अस्वस्थ झालं. सहजपणे वीस 25 वर्षांपूर्वीची आठवण झाली. तेव्हा गुरुजी जरी होते आणि शाळा ही गरीब होती. पगार कमी असल्यामुळे गुरुजी गावातच राहायचे. गावाच्या प्रत्येक घराशी त्यांचे नातं. विद्यार्थ्यांच्या आई वडिलांशी संवाद. मुलगा शाळेत आला नाही तर गुरुजी थेट त्या मुलाच्या घरी जायचे. त्या कौलारू मातीच्या भिंती असलेल्या शाळांनी या देशाला आयएसआय दिले, डॉक्टर दिले, अभियंते दिले, सैनिक दिले, शास्त्रज्ञ दिले त्या शाळांनी देश घड. त्याकाळी घरात बापाचा जितका दरारा होता तितकाच गुरुजींच्याही होता. काही ठिकाणी तर देवापेक्षाही गुरुजींचा मान मोठा होता. पुढे मात्र काळ बदलला गुरुजींचे दिवस पालटले. मोठे पगार झाले शहरात घरे झाली. गाड्या आल्या, सुख सोई आल्या. हे सगळं योग्यच आहे आणि त्याचा सर्वांनाच आनंदच आहे. पण एक प्रश्न सतत मनाला सतावत राहतो. तो म्हणजे गुरुजींच्या दारिद्र्य संपलं! मग ग्रामीण भागातील शाळेचा दारिद्र्य का संपलं नाही?
शाळेचा शप्पथ अजूनही गळतय, शाळेच्या भिंती अजूनही पडक्या अवस्थेत आहेत. आहे पहिला ग्रामीण भागातील शाळेतील पटसंख्या ही नेहमी कमी होत चालली आहे. आणि तब्बल 17000 च्या पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा या कायमच्या बंद पडल्या आहेत. ही केवळ शाळा बंद झाली नाहीत तर गरिबांच्या स्वप्नांची दार बंद झाली, ही हजारो गावांच्या भविष्याची हत्या झाली, ही लाखो मुलांच्या संधीची गळचेपी झाली. आज परिस्थिती इतकी दयनीय झाली आहे की शाळेला फुगे लावून रॅली काढू नको गुलाबाचे फुल देऊन पालकांना विनंती करावी लागते कृपया आपल्या मुलाला आमच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्या! गरीब बाप अजून एक अर्ज काढून मुलाला खाजगी शाळेत पाठवतो. कारण त्याला विश्वास राहिलेला नाही त्याला वाटतं की मी गरीब आहे पण माझं मूल तरी गरीब राहू नये. ही वेळ का आली? याला फक्त सरकार जबाबदार आहे का? माझा प्रश्न माझ्या सर्व शिक्षक मित्रांना आहे? सरकारची वाट किती दिवस पाहणार? तुमच्या पगारातील एक टक्का रक्कम वर्षातून एकदा आपल्या शाळेसाठी खर्च केली तर काय बिघडेल? गावातील माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणा गावातून वर्गणी गोळा करा, शाळेच्या रंग रंगोटी पासून ग्रंथालयापर्यंत एखादा नवीन उपक्रम स्वतः उभा करा.
*निवृत्त शिक्षकांना ही माझी नम्र विनंती*
घरी बसून वेळ घालण्यापेक्षा आठवड्यातून एक-दोन दिवस तरी आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत जा दोन तीन तास मुलांना शिकवा तुमचा अनुभव ही त्या मुलांसाठी मोठी संपत्ती आहे असे मला वाटते. लक्षात ठेवा तुमची ओळख तुमचा सन्मान तुमचा पगार तुमचं घर तुमची गाडी या सगळ्यांचा पाया त्या जिल्हा परिषद शाळेला घातलेला आहे. आज त्या शाळेला तुमची गरज आहे.
सरकार बदलतील,
धोरण बदलतील,
अधिकारी बदलतील,
पण गावातील शाळा वाचवायची असेल तर शिक्षकांनी पुन्हा एकदा फक्त नोकरी करणारे कर्मचारी न राहता गुरुजी व्हावे लागेल. कारण शाळा वाचली तर गाववाचे गाव वाचलं तर समाजाचे आणि समाज जर वाचला तर देशाचा भविष्यकाळ उज्वल राहील.
एक वैचारिक लेख.



