संग्रामपूर तालुका भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांची बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्रवचन मालिकेला तालुक्यातील विविध गावांमध्ये सदिच्छा भेट!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी
रतन भगत.
संग्रामपूर दि.२२/९/२६ सविस्तर वृत्त असे की, संग्रामपूर तालुक्यातील एकूण ५६ गावांमध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे मनन पठण चिंतन आणि वाचन सुरू आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी आणि सहकारी यांची गेल्या दिनांक २०/९/२६ वार रविवार रोजी संग्रामपूर तालुक्यातील एकूण आठ ते नऊ गावांमध्ये प्रवचन मालिकेला सदिच्छा भेट झाली. यामध्ये प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव आयुष्यमान मिलिंद वानखडे सर, तसेच संग्रामपूर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आयुष्यमान भाऊराव गव्हांदे साहेब, तसेच वंचित बहुजन आघाडीचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष माननीय किशोर भाऊ भिडे यांची संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ज्या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ याचे वाचन म्हणून पठणाने चिंतन चालू आहे. अशा ठिकाणी या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आणि तेथे उपस्थित जनसमुदायाला बुद्ध आणि धम्म त्याचा धम्म प्रवचन मालिकेवर संबोधन केले. त्यामध्ये खिरोडा येथे तालुका प्रभारी अध्यक्ष भाऊराव गव्हांदे साहेब, रतन भगत, आवार येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव आयुष्यमान मिलिंद भाऊ वानखडे सर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर भाऊ भिडे सर, यशवंतराव वानखडे साहेब, दीपक भाऊ पहुरकर साहेब, तसेच सावळा येथे बुद्धाचार्य विठ्ठल तायडे साहेब, गौतम प्रधान, तसेच एकलारा येथे मोहन इंगळे सर, तर पातुर्डा भीम नगर येथे भाऊराव अवचार साहेब, साहेबराव बाभुळकर साहेब, तर कवठाळे येथे बुद्धाचार्य दिलीप वाकोडे साहेब, सागर वाकडे साहेब, तसेच वानखेडे येथे बोधाचार्य डी एन खंडारे साहेब, सुखराम बाभुळकर साहेब, तसेच धामणगाव गोतमारे येथे वंदनाताई भगत मॅडम, तर झाशी येथे रणदीप सपकाळ साहेब, तसेच बौद्धाचार्य निलेश लहासे साहेब, इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवचन मालिकेला भेट देऊन उपस्थित जनसमुदायाला धम्माबद्दल विचार सांगितले. सदर कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणी शांततेत पार पडला.



