खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देऊळगाव राजा तहसीलदारांना निवेदन; दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा: चालू वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत कमी आणि अनियंत्रित पाऊस पडल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांवर मोठा खर्च करूनही पदरात काहीच पडले नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय देऊळगाव राजा यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

कोरडा दुष्काळ जाहीर करा: देऊळगाव राजा तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पीडित शेतकऱ्यांना एकरी ५०,००0/- रुपये आर्थिक मदत देण्यात यावी.

चारा छावण्या सुरू करा: शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या उभारून, चारा व पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात यावी.

रोजगार उपलब्ध करा: शेतमजूर आणि कामगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करण्यात यावीत.

वीज बिल व कर्जमाफी: शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे, तसेच इतर सर्व प्रकारची शासकीय वसुली व कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, दादाराव खर्डे , गोविंदराव झोरे, अजय शिवरकर, पवन झोरे,किशोर खेडेकर ,राजू नागरे, मोहन खांडेभराड,गिरीश वाघमारे, योगेश मिसाळ, विशाल उकळकर,अमर, मंगेश ,नागेश पराड, सुनिल l खेडेकर, सौरव इंगळे, विजय जाधव,
लोकप्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button