जळगावा जिल्हामहाराष्ट्र

मुक्ताईनगरात ‘पोस्ट एसआयआर’ व दावे-हरकती निकाली काढण्याबाबत प्रशिक्षण

मुक्ताईनगर | प्रतिनिधी :
शहरातील एस. एम. महाविद्यालयातील ज्ञानेश्वर सभागृह येथे ‘पोस्ट एसआयआर’ तसेच मतदार यादीतील दावे-हरकती निकाली काढण्यासंदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणास सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गिरीष वखारे, निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, सर्व एडीआरओ, बीडीओ कीर्ती कनवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रविण बेनुकुळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश पुदाके, बीएलओ, सुपरवायझर तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ‘पोस्ट एसआयआर’ प्रक्रियेतील कामकाज, तसेच दावे-हरकती निकाली काढण्याची कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित कामकाज अचूक व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना, प्रक्रिया आणि महत्त्वाच्या बाबी प्रशिक्षणादरम्यान स्पष्ट करण्यात आल्या.

प्रशिक्षण मास्टर ट्रेनर अतुल लोढे यांनी घेतले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.

‘पोस्ट एसआयआर’ तसेच दावे-हरकतींच्या कामकाजास गती मिळून प्रक्रिया अधिक सुसूत्र व अचूकपणे पूर्ण होण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. संगणक चालक विक्रम वानखेडे यांनी प्रशिक्षण अधिक सुलभ होण्यासाठी सहकार्य केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button