जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भ

मुक्ताईनगरात अनधिकृत बांधकामाला नगरपंचायतीची नोटीस; काम तात्काळ बंद करण्याचे निर्देश

मुक्ताईनगर | प्रतिनिधी :

मुक्ताईनगरात अनधिकृत बांधकामाबाबत नगरपंचायतीची नोटीसपरवानगीतील अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका; गटार व पाणीपुरवठा पाइपलाइनला धोकामुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील एका बांधकामाबाबत नगरपंचायतीने संबंधितास अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस बजावली आहे. दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या स्थळ पाहणीमध्ये नगरपंचायतीने दिलेल्या बांधकाम परवानगीप्रमाणे प्रत्यक्ष बांधकाम होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील गट क्रमांक ५४२ मधील प्लॉट क्रमांक ७४/२ येथे नगरपंचायतीने बांधकामाची परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान परवानगीतील अटी व नियमांनुसार बांधकाम होत नसल्याचे आढळून आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या गटारीवरील बांधकामामुळे गटारीचा प्रवाह बाधित झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद आहे. संबंधित बांधकामामुळे भविष्यात पोकळी निर्माण होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.याशिवाय, मुक्ताईनगर शहरातून जाणाऱ्या पाणीपुरवठा पाइपलाइनवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित बांधकाम परवानगीमध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करूनच बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नगरपंचायतीने संबंधितास सिमेंट टँकचे बांधकाम नियमानुसार करणे, रस्त्याच्या कडेला व पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनजवळ आवश्यक अंतर राखणे तसेच नियमबाह्य बांधकाम असल्यास त्याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणी संबंधिताने आपले म्हणणे व आवश्यक कागदपत्रांसह नगरपंचायत कार्यालयात हजर राहावे, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या बांधकामावर नगरपंचायत प्रशासन पुढे कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button