35 दिवसापासून पावसाची दडी संपूर्ण जळगांव जामोद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगांव जामोद
जळगांव जामोद तालुक्यात गेल्या 35 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन व कापूससह खरीप पिके संपूर्ण संकटात आली आहेत पावसाअभावी विहीर व बोरवेल ची पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर किसान एकता महासंघाच्या वतीने तहसील जळगांव जामोद ला निवेदन देऊन जळगांव जामोद तालुक्यातील आसलगाव सह संपूर्ण तालुक्यातील मंडळांची दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये सानुग्रह मदत व जनावरांसाठी चारा तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्रत्यक्ष शेती पिकांचे सर्वेक्षण करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने विलंब न करता ठोस उपाय योजना कराव्यात. अशी मागणी किसान एकता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
✍🏾



