बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नांदुरा येथे बजरंग दलाची मानाची कावड यात्रा उत्साहात संपन्न,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

बुलढाणा प्रतिनिधी-प्रशांत चव्हाण

नांदुरा : (दि 31 ऑगस्ट) नांदुरा येथे
महादेवाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात बजरंग दलाच्या वतीने आयोजित मानाची कावड यात्रा नांदुरा शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली.
कावड यात्रेदरम्यान ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भगवे ध्वज, दीपक बँड गलंगी या फेमस डीजेच्या भक्तिमय गजरात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात कावडधारकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील विविध मार्गांवरून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रेत बजरंग दलाचे कार्यकर्ते, शिवभक्त तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. भाविकांनी कावडधारकांचे स्वागत करून महादेवाचे दर्शन घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेला विशेष धार्मिक व उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. नागरिकांनीही सहकार्य करत यात्रा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यास हातभार लावला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button