रावेर शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यां दुकान मालकावर केली कारवाई..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर

आज दि. ३०/०८/२०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे तसेच गोपनिय शाखा व गुन्हे शोध पथक हे सण उत्सव येत असल्याने रावेर शहरात पेट्रोलींग करीत असतांना पथकास सावदा रोडवर सुपर मटन सेंटर चा मालक हा उघड्यावर लोकांना सहज दिसेल अशा पद्धतीत बोकड्याचे मांस विक्री करताना आढळुन आला. दुकानाची आतुन तपासाणी केली असता सदर दुकानात तीन बोकड्यांचे मांसांचे सांगाडे हे लटकवुन चामडे बाहेर ठेवलेले दिसले व आजु बाजूला कतल केलेल्या बोकड्वे रक्त पडलेले होते आणि मांसांवर मोठ्या प्रमाणात माश्या बसलेल्या दिसल्या. सदर तुकड्यामधुन पडलेल्या रक्तामधुन सडलेली दुर्गंधी येत होती. सदर दुर्गंधी मुळे आजुबाजुच्या परिसरात व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जिवीतास संसर्गजन्य रोगाचा प्रभाव होण्याची संभाव शक्यता होती. तसेच लोकांच्या आरोग्यास व जिवीतास रोगाचा संसर्ग पसरण्याची संभव असलेली कृती ही बेकायदेशीरपणे व निष्काळजीपणे केली जात होती असे पथकास निदर्शनास दिसले.
त्यावरुन रावेर पोलीस स्टेशन येथे संशयीत दुकान मालक ०१) शेख इरफान शेख खलील ०२) शेख फिरोज शेख खलील रा. मदीना कॉलनी रावेर यांच्यावर सकरातर्फे गोपनिय शाखेचे अमंलदार पो.हे.कॉं.हिरालाल गुमळकर यांनी फिर्याद दिलेवरुन गु.रं.नं- ४०७/२०२६ भा.न्या.संहीता कलम २७१ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम व्या कलम १०५ , ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर मांस विक्रेत्यांना वेळोवेळी सुचना देत असुन यापुढे ही कार्यवाही वालु राहणार आहे.
सदर कार्यवाही ही मा. श्रीकांत धिवरे सो पोलिस अधिक्षक जळगांव , मा. श्री संदीप गावीत सो अपर पो. अधिक्षक जळगांव परीमंडळ, तसेच मा.श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षफ फैजपुर विभाग तसेच रावेर पोलिस स्टेशन वे पो.नि.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनखाली स.पो.नि हरीदासा बोचरे गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉं समाधान ठाकुर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, यांनी केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉं हमीद तडवी हे करीत आहेत.
s/d
(संदीप पाटील )
पोलिस निरीक्षक
रावेर पोलिस स्टेशनc



