बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

प्रा. अविनाश पडघान यांना प्रतिष्ठान कला, संस्कृती आणि साहित्य संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल; पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान

चिखली :-प्रतिष्ठान कला, संस्कृती आणि साहित्य संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रा. अविनाश राजेंद्र पडघान यांना पुणे येथील हॉटेल श्री पंचरत्न येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रा. अविनाश राजेंद्र पडघान यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे येथील उपायुक्त श्री. अण्णा बोडदे, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. जितेंद्र पानपाटील, पुणे येथील पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र निकाळजे तसेच एस.एन.जी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, पुणेचे संचालक डॉ. किशोर एन. जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रा. अविनाश राजेंद्र पडघान
यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सन्मान त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाची दखल घेणारा ठरला.

पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.अविनाश राजेंद्र पडघान यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button