हल्द्वानी (उत्तराखंड) येथील मंदिराचे ‘शुद्धीकरण’ प्रकरण आणि संसद ते राज्य पातळीवरील राजकीय वाद:

भाजप च्या अश्या राजकीय पिलावळाला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ -कैलास फाटे
जी. डी .रोकडे प्रतिनिधी
खामगाव : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर एका भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या नंतर काँग्रेस अध्यक्ष मालिक्का अर्जुन खरगे एका मंदिर मध्ये दर्शनासाठी गेले होते त्या नंतर एका हिंदुत्ववादी संघटनेने (श्री राम सेना)ने ‘शुद्धीकरण यज्ञ’ (हवन) करून मल्लिकार्जुन खरगे यांचा अपमान केला असुन भाजप च्या ह्या पिलावळानी अकलेचे तारे तोडले आहेत एका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बाबत असं कृत्य या पिलावळाना अशोभनीय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत यापुढे जर अश्याच प्रकारे अपमान केला गेला तर आता येथून पुढच्या काळात अश्या माजलेल्या पिलावळाना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा काँग्रेस चे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष obc विभाग कैलास फाटे यांनी दिला आहे……✒️



